शुक्रवार, १ सप्टेंबर, २०१७

टीम ( TEAM ) म्हणजे नक्की काय ?

टीम ( TEAM ) म्हणजे नक्की काय ?


एकदा एक श्रीमंत उद्योगपती एका खेडेगावात कारखान्यासाठी साईट बघायला गेला होता.
रस्ता कच्चा, खडबडीत होता. काही ठिकाणी रस्त्यात पाणी पण साठले होते, खुप चिखल झाला होता. येताना त्या उद्योगपतीची गाडी चिखलात रुतली आणि बंद पडली. कोणाची मदत मिळते का हे बघायला तो गाडितून खाली उतरला. त्याला थोड्या अंतरावरू एक म्हातारे शेतकरीबाबा येताना दिसले. त्याने त्या शेतकरीबाबांना थांबले, गाडी चिखलात रुतल्याचे सांगीतले व मदत करण्याची विनंती केली.
शेतकरी बाबा गाडीजवळ आले, पहाणी केली आणि म्हणाले, ‘ नामदेवला, म्हणजे नाम्याला बोलवायला लागेल….!
’‘मग बोलवाना तुमच्या त्या नाम्याला! मी त्याला चांगले बक्षीस देईन! मस्त जेवायला, खायला घालेन …!’ तो उद्योगपती म्हणाला….!
आहो नाम्या म्हणजे कोणी माणुस नाही. तो येक बैल आहे. मी आत्ता त्याला घेऊन येतो!’ ते शेतकरी म्हातारबाबा म्हणाले व लगेचच ‘नाम्याला’ म्हणजे त्या बैलाला घेऊन आले.
त्या बैलाला दोरीच्या सहाय्याने गाडीला जुंपले आणि म्हणाले. ‘हे हरबा खेच! हे ढवळ्या खेच! हे नाम्या खेच! हे पवळ्या खेच!’
त्याबरोबर त्या बैलाने जोर लाऊन ती गाडी चिखलातून खेचून बाहेर काढली. हे बधून तो उद्योगपती खुष झाला पण त्याला समजेना की गाडीला एकच बैल जुंपलेला असताना त्या म्हातारबाबांनी चार बैलांची नावे का घेतली …
उद्योगपतीने त्याचे कारण विचारले तेव्हा ते म्हातारबुवा उत्तरले .
‘त्याचे काय आहे! आमचा नाम्या आहे म्हातारा आणि आंधळा. त्याला दिसत नाही. त्यामुळे त्याला एकट्यालाच गाडीला जुंपले आहे हे त्याला माहीत नाही. मी अजून तीन बैलांची नावे घेतली कारण नाम्याला वाटावे की त्याच्याबरोबर अजून तीन बैल आहेत. म्हणजे तो टिममध्ये काम करतो आहे. म्हणूनच तो त्याची ताकद पणाला लाऊन सर्वोत्तम काम करून दाखवतो. साहेब तुमच्या भाषेत याला ‘टीम स्पिरीट’ म्हणतात नाही का?’
एका पागोटे, मुंडासेवाल्या म्हातार्‍या शेतकरीबुवांचे हे बोलणे ऐकून तो उद्योगपती चाटच पडला …
या कथेतील मतितार्थ ….
  • कोणतेही काम हे टिम/संघटन केल्याशिवाय होणे अशक्य जरी असले तरी त्या टिम मधिल सर्व घटकांनी कोणाचीही वाट न पाहता जर जीव ओतून व जोर लावून काम केल्यास ते कार्य अव्दितीय व चोक झाल्याशिवाय राहत नाही …
  • आपल्या बरोबर कोणी असू नाही तर नसू आपल्यावर असणारी जबाबदारी आपण अगदी चोखपणे करु शकतो हा विश्वासच आपल्याला मनोबल देवून कार्य करुन घेण्यास सहाय्य करत असतो …
  • आपण स्वत: म्हणजेच एक टिम आहे असे समजून व प्रत्येक सहकार्‍या बरोबर स्वत: पुढे होऊन कार्य केल्यास बरोबर असणारांचाही आत्मविश्वास वाढत असतो …
  • टिम किंवा संघटनात्मक काम करत असताना मी बरोबर आहे तुम्ही हे करा, तुम्ही ते करा असे सांगून बघत बसणारे त्या टिमसाठी घातक मेंबर ठरतात …
  • मी हे करु शकतो आणि मीच करणार, फक्त माला या कामात थोडी मदत करा असे म्हणून कार्य करणारे ग्रेट असतात …
TEAM या शब्दाचा अर्थ …..
T = Together ….
E = Everyone …
A = Achieves …
M = More …










by - http://marathimotivation.in

बॅड पॅच एक संघर्ष | bad patch a struggle

बॅड पॅच एक संघर्ष | bad patch a struggle


बॅड पॅच

प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी ‘बॅड पॅच’ येतो.
शांत सुरळीत सुरु असलेल्या आयुष्यात,
करीयर मध्ये काहीतरी बिघडतं,
नात्यांमध्ये काहीतरी बिघडतं,
व्यवहारांचा काहीतरी लोच्या होतो,
पैशांची बिकट वाट लागते…नड येते
आणि बहुदा हे सारं एकदमच, एकाच वेळी घडतं!!
हा असा बॅड पॅच आला की तो आपल्या आयुष्यात महिना दोन महिने किंवा क्वचित दोन चार वर्षंही रेंगाळतो… आपलं आयुष्य आंतर्बाह्य हालवून टाकतो… आयुष्य नकोसं करुन सोडतो…
आपण कितीही नको म्हणलं, टाळायचं ठरवलं तरी हा असा बॅड पॅच येतो…. …
संपूर्ण आयुष्यात एक-दोन-चार-सहा कितीही वेळा येतो… अन आपल्याला तो भोगावा, अनुभवावाच लागतो…
कितीही नकोसा वाटला, कितीही त्रास झाला तरी या बॅड पॅचचे काही विलक्षण फायदेही असतात!!

बॅड पॅचचे फायदे

यातले दोन प्रमुख फायदे म्हणजे:

1. फायदा नंबर एक

खरोखर आपलं कोण आहे आणि कोण नाही हे बॅडपॅच असतानाच कळतं… आपल्या वाईट आणि पडत्या काळातही कोण आपल्या सोबत खंबीरपणे उभं रहातं, कोण आपला हात सोडत नाही, कोण आपल्या पाठीशी आधार देत उभं रहातं हे फक्त बॅडपॅच असतानाच उमगतं!

2. फायदा नंबर दोन

आपली स्वतःची आपल्याला नव्यानं ओळख होत रहाते.
अत्यंत वाईट परिस्थितीत आणि प्रसंगांत आपण कसे वागतो,
  • काय बोलतो,
  • काय करतो,
  • काय निर्णय घेतो
हे आपलं आपल्याला समजू शकतं…
आपली शक्तीस्थळं आणि मर्यादा यांची नव्यानं जाणीव होते. क्रिकेटर, व्यापारी, कलाकार, राजकारणी, सामान्य माणसं, असे कोणालाच यापासून वाचता येत नाही.मात्र, हा वाईट काळ प्रत्येकाला काही शिकवून जातो.
यामुळे स्वतःविषयीचा विश्वास वाढतो आणि जगण्याविषयीची नम्रताही येत रहाते…!
अर्थात, बॅडपॅच येणंही आपल्या हातात नाही आणि टाळणंही आपल्या हातात नाही… पण तो जेंव्हा येतो तेंव्हा त्याला प्रतिसाद कसा द्यायचा react कसं करायचं हे आपल्या हातात असतं… आपला बॅडपॅच आहे नाकारून उद्दामपणे जगत रहायचं आणि स्वतःचं नुकसान करत रहायचं का तो स्वीकारून नम्र व्हायचं, आत्मपरीक्षण करायचं आणि स्वतःत बदल घडवत सजग जगायचं हे आपल्याच हातात असतं!!
असो… आपणा सर्वांच्या आयुष्यात कमित कमी बॅडपॅच येवोत आणि जे येतीलच त्यांमधून आपलं आयुष्य अधिकाधिक समृद्ध करण्याची ताकद आपणां सर्वांना लाभो…!
संघर्षातून जीवन जगण्याची मजा काही औरच…….
(लेखक:अनामिक)



by - http://marathimotivation.in

वॉरन बफे यांचे श्रीमंत होण्यासाठीचे महत्वाचे सूत्र

वॉरन बफे यांचे श्रीमंत होण्यासाठीचे महत्वाचे सूत्र

 
वॉरन बफे (Warren Buffet)

वॉरन बफे हे एक अमेरिकन गुंतवणूकदार व उद्योगपती आहेत. बफे ह्यांना जगातील सर्वोत्कृष्ट गुंतवणूकदार मानण्यात येते. बफे हे बर्कशायर हॅथवे ह्या गुंतवणूक कंपनीचे अध्यक्ष व प्रमुख अधिकारी आहेत. 2008 साली बफे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते तर 2016 साली ते तिसर्‍या क्रमांकावर आहेत.
ओमाहा ह्या शहरामध्ये जन्मलेल्या वॉरन बफे ह्यांनी वयाच्या १५व्या वर्षापासून शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. गर्भश्रीमंत असताना देखील आपल्या काटकसरी जीवनशैली व साधे राहणीमान जगणार्‍या बफे ह्यांनी आपल्या संपत्तीच्या ९९ टक्के भाग परोपकारी कामांसाठी (चॅरिटी) दान केला आहे.
संदर्भ: विकिपीडिया

वॉरन बफे यांचे 15 सूत्र आणि विचार


“NEVER DEPEND ON SINGLE INCOME. MAKE INVESTMENT TO CREATE A SECOND SOURCE.”
1.कधीही एका इनकम सोर्स (उत्पन्न स्रोत) वर अवलंबून राहू नका. त्याची गुंतवणुक करा आणि दुसरे इनकम सोर्स (उत्पन्न स्रोत) निर्माण करा.
“PRICE IS WHAT YOU PAY. VALUE IS WHAT YOU GET.”
2.किंमत जी तुम्ही देता, मुल्य जे तुम्हाला मिळते.
“IF YOU BUY THINGS YOU DO NOT NEED, SOON YOU WILL HAVE TO SELL THINGS YOU NEED.”
3.जर तुम्ही तुम्हाला गरज नसलेल्या गोष्टी विकत घेत असाल तर लवकरच तुम्हाला तुमच्या गरजेच्या गोष्टी विकण्याची वेळ येणार आहे असा समजा.
“DO NOT SAVE WHAT IS LEFT AFTER SPENDING, BUT SPEND WHAT IS LEFT AFTER SAVING.”
4.खर्च करुण शिल्लक राहिलेले पैसे वाचवू नका, तर पैसे वाचवून जे शिल्लक राहते ते खर्च करा.
“NEVER TEST THE DEPTH OF RIVER WITH BOTH THE FEET.”
5.आपल्या दोन्ही पायांनी कधी पाण्याची खोली मोजु नका.
“DO NOT PUT ALL YOUR EGGS IN ONE BASKET.”
6.एक टोपल्यात तुमचे सर्व अंडे नका ठेवू.
“NEVER TEST THE DEPTH OF RIVER WITH BOTH THE FEET.”
7.नदी किती खोल आहे हे बघण्या साठी दोनही पायांचा उपयोग नका करू
“RISK COMES FROM NOT KNOWING WHAT YOU’RE DOING.”
8.धोका तेव्हाच निर्माण होतो जेव्हा आपल्याला माहित नसते आपण काय करतोय.
“I ALWAYS KNEW I WAS GOING TO BE RICH. I DON’T THINK I EVER DOUBTED IT FOR A MINUTE.”
9.मला माहिती होत मी श्रीमंत बनणार आहे या बद्दल माझ्या मनात एका मिनिटासाठीही कधी शंका आली नाही.
“RULE NO.1: NEVER LOSE MONEY.
RULE NO.2: NEVER FORGET RULE NO.1.”
10.नियम क्र.1 कधीही तुमचे पैसे गमावू नका
नियम क्र.2 कधीही नियम क्र.1 विसरू नका.
“THE MOST IMPORTANT INVESTMENT YOU CAN MAKE IS IN YOURSELF.”
11.स्वतः मध्ये केलेली गुंतवणुक म्हणजे सर्वात महत्वाची गुंतवणुक
HONESTY IS VERY EXPENSIVE GIFT. DO NOT EXPECT IT FROM CHEAP PEOPLE.
12. प्रामाणिकपणा हे खूप महागडी वस्तू आहे त्याला हलक्या लोकांकडून अपेक्षा करू नका
“I AM A BETTER INVESTOR BECAUSE I AM A BUSINESSMAN AND A BETTER BUSINESSMAN BECAUSE I AM AN INVESTOR”
13.मी एक चांगला निवेशक आहे कारण मी एक व्यापारी आहे आणि मी एक चांगला व्यापारी आहे कारण मी एक निवेशक आहे.
“ALWAYS INVEST FOR THE LONG TERM.”
14.नेहमी दीर्घकालीन गुंतवणूक करा.
“SOMEONE’S SITTING IN THE SHADE TODAY BECAUSE SOMEONE PLANTED A TREE A LONG TIME AGO.”
15.आज कोणीतरी झाडाच्या थंड सावली मध्ये बसलेला आहे, कारण ते झाड खूप पूर्वी कोणी तरी लावलेलं होत.


by - http://marathimotivation.in

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीं बद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्टस

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीं बद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्टस

भारताचे माजी प्रधानमंत्री आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी (atal bihari vajpayee) यांचे आज म्हणजे 25 डिसेंबर ला वाढदिवस होय. वाजपेयी याना आधुनिक राजकारणाचा भीष्म पितामह चा रूपात ओळखले जाते. ते आपल्या भाषणाने सगळयांचे मन मोहून घेत.
विरोधक देखील त्यांच्या भाषणा मुळे आणि त्यांच्या स्वभावामुळे त्यांचा कडे आकर्षित होत, त्यांना मान सन्मान देत. आज त्याचा वाढदिवसा निमित्य अटल जी बद्दल काही रौचक गोष्टी ज्या सहसा कोणाला माहिती नाहीत.
अटलजी बाळासाहेबां सोबत

1)जन्म

अटलजींच जन्म हा ग्वालियर मध्ये झालं, पण त्यांच गाव बटेश्वर हे होत जे आगरा जवळ आणि यमुना नदी किनारी बसले आहे. बटेश्वर हे गाव तेथील डाकुं मुळे कुख्यात होत, पण अटलजी नी त्या गावची छवी बदलून त्या गावाला शिवमंदिरांमुळे विख्यात केलं आहे.

2)साहित्य आणि कवितेचं बाळकडू

लहानपणा पासूनच साहित्य आणि कवितेचं बाळकडू अटल जी यांना मिळालं. यांचे वडील कृष्ण बिहारी हे संस्कृत भाषाचे आणि साहित्याचे विद्वान होते. त्यांनी घरात खूप साऱ्या पुस्तकांचं संग्रह केला होता. त्यांचा मुळेच अटल जी देखील पुढे चालून कविता करायला लागले.

3)वडील शिकले सोबत

जेव्हा अटलजी कानपुर च्या डीएवी कॉलेज मध्ये लॉ च्या डिग्री साठी ऍडमिशन घेत होते तेंव्हा त्यांचा वडलांना देखील लॉ शिकण्याचा मोह झाला. मग काय अटलजीं आणि त्यांचा वडलांनी एकत्रच लॉ ची डिग्री पूर्ण केली आणि अटलजी अशे नशिबानं ठरले ज्यांनी वडिलांसोबत एकत्र शिक्षण घेतलं.

4)अगोदर केली पत्रकारिता

अटल जी नी राजकारण अगोदर पत्रकारिता पण केली आहे. ते पांचजन्य पत्रिका मध्ये संपादक म्हणून काम केलं आहे. या सोबत अश्या खूप साऱ्या वृत्त पत्रिकांमध्ये संपादक म्हणून काम केलं आहे.

5)खाण्याचा छंद

त्यांना लहानपणा पासूनच नवनवीन पदार्थ खाण्याची आवड होती. ते कोठल्या नव्या शहरात गेले तेंव्हा त्या शहरातील सर्वात चांगला आणि प्रसिद्ध खाद्य पदार्थ खात असत. ते लोकसभा च्या कँटीन मधले जेवण जेवत नसत त्यांचा साठी घरातून डबा येत असे.

6)शांत स्वभाव

अटलजींच स्वभाव शांत होत. त्यांना कोणी कधी रागात असलेलं पहिल नाहीे. ते त्याचा सोबत काम करणाऱ्याला कधी रागावत पण नसतं. पण जे त्याचा जवळचे होते त्याना अटलजींचा चेहरा बघूनच कळत असे कि काही तरी चुकलंय किंवा त्यांना काहीतरी आवडले नाही ते.
अटलजी आणि श्री नरेंद्र मोदी

7)हिंदीत भाषण

ते देशातील पहिलेच नेते ज्यांनी 1977 मध्ये संयुक्त राष्ट्रा च्या सभेत हिंदीत भाषण दिल. या अगोदर कोणी तिकडे हिंदी मध्ये भाषण दिले नव्हते. अटलजी यांनीच हिंदीला संयुक्त राष्ट्रांत ओळख मिळवून दिली.

8)गैर काँग्रेसी अधिक काळ राहिले पंतप्रधान

अटलजी हे भारताचे तीन वेळा पंतप्रधान राहिले आहेत. नेहरू यांचा नंतर असे करणारे ते एकटेच. ते 9 वेळा लोकसभेत निवडून गेले. एवढंच नाही तर ते नेहरू आणि इंदिरा गांधी नंतर सर्वात जास्ती काळ गैर काँग्रेसी पंतप्रधान राहिले.

9)निर्भीड व्यक्तिमत्व

अटलजी आणि कलाम चर्चा करत असताना
ते धाडसी निर्णय घ्यावयास अजिबात घाबरत नसत. भारताने 11 मे 1998 रोजी पोकरण येथे अणू चाचणी घेतली. त्या वेळी अटलची यांचं सरकार होत. यामुळे सर्व विकसित देशांनी भारतावर खूप प्रकारचे निर्बंध लादले. याची कल्पना असताना अटलजींनी भारताला नुक्लिर स्टेट बनवायला हे जोखीम घेतली. त्यांचा काळातच अग्नी 2 आणि आणू यांची यशस्वी चाचणी भारताने घेतली













by - http://marathimotivation.in

सलमान खान बद्दल ची ही माहिती तुम्हाला माहिती आहे का?


सलमान खान बद्दल ची ही माहिती तुम्हाला माहिती आहे का?



सलमान खान (salman khan) बद्दल माहिती नसलेले काही रोजक तथ्य

1). पीपल्स मॅगझीन ने जगातील सर्वात देखण्या पुरुषांची (most handsome men) यादी बनवली होती. या यादीत काही निवडक पुरुषांचा समावेश होता त्यात salman khan चे देखील नाव होते.
2). सलमान च्या एका फॅन चे मुंबई येथे भाईजान नावाचे रेस्टोरेंट आहे. या रेस्टोरेंट ची खास गोष्ट म्हणजे यात सलमान ची सर्व फेव्हरेट डिश मिळतात. एवढंच नाही तर रेस्टोरेंट च्या मधील भिंती आणि इंटिरियर हे सलमान च्या पोस्टर्स नी बनवलेले आहेत आणि यात त्याचा व्यक्तिगत जीवना बद्दल खूप सारे लिहले गेले आहेत. या हॉटेल चे गेट हे सलमान च्या बांद्रा स्थित घरा सारखंच तयार केलं गेलं आहे.
3). सलमान ला ऑनलाईन राहणे जास्ती आवडत नाही म्हणून त्याच आणखी कुठलं ही ई-मेल आयडी नाहीये. या वर तो फोन मुळे ई-मेल आयडी ची गरज भासली नाही असे सांगतो.
4). सन 2015 मध्ये सलमान खान आपल्या बजरंगी भाईजान च्या पूर्ण युनिट सोबत कर्जत मधील सर्व घरांना पेंट केलं होतं. हे एका प्रकारे त्या गावाला सलमान ने नववर्षाचं गिफ्ट दिल होत.
5). सलमान ला वेगवेगळ्या प्रकारचे आंघोळीचे साबण आवडतात. या मुळे तो आपल्या बाथरूम मध्ये सर्व प्रकारचे साबण ठेवतो. त्याचा कडे हर्बेल साबणाचा मोठा कलेक्शन असून तो नवीन ठिकणी गेला तर तिकडचे प्रसिद्ध साबण घेत असतो.

image www.bollywoodbubble.com/

6). सलमान चा आवडता हिरो सिल्व्हेस्टर स्टेलोन आहे आणि आवडती हिरोईन हेमा मालिनी आहे.
7). सलमान ला गाड्यांचे खूप नाद आहे. त्यांचा कडे BMW, land cruiser कारों मे BMW, लैंड क्रुज़र आणि मर्सिडीज बेंज सारख्या महागड्या गाड्या त्याचा कडे आहेत.

image: carblogindia.com

8). सुपर हिट फिल्म बाजीगर साठी शाहरुख अगोदर सलमान कडे ऑफर आली होती, पण त्याने काही कारणांमुळे ती ऑफर स्वीकारले नव्हते.
9). जय हो या चित्रपटाचं पोस्टर सलमान ने स्वतः आपल्या हाताने पेंट केलं आहे.

image: UrbanAsian.co






- by MarathiMotivation.in

मुकेश अंबानी चे जगातील सर्वात महागडे घर बघा काय आहे यात खास

मुकेश अंबानी चे जगातील सर्वात महागडे घर बघा काय आहे यात खास

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचं घर ज्याला अँटिलिया (Antilia) असे देखील म्हणतात. ते जगातील सर्वात मोठ आणि महागडं घर ठरले आहे.
 

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचं घर ज्याला अँटिलिया (Antilia) असे देखील म्हणतात. ते जगातील सर्वात मोठ आणि महागडं घर ठरले आहे.  जगात या पेक्षा महागड्या वास्तू आहेत पण कोणाचे वयक्तिक मालकी असलेला घर म्हणून अँटिलिया हा सर्वात महाग घर आहे. या तर बघू काय आहे यात विशेष जे याला जगातील सर्वात महागडे घर बनवते.

अँटिलिया (Antilia) जगातील सर्वात महागडे घर

अँटिलिया (Antilia) हा जगातील सर्व प्रकारचा मागड्या घरांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येत. पहिल्या क्रमांकवर ब्रिटन चे बकिंघम पॅलेस हे येत. तुमच्या माहिती साठी बकिंघम पॅलेस मध्ये ब्रिटनची राणी राहते खरं पण ते घर सरकार च्या मालकीचं आहे. या साठी मुकेश अंबानी यांचे अँटिलिया हे घर व्यक्तिगत मालकीचे जगातील सर्वात महाग घर आहे. या घराची किंमत सध्याच्या बाजार भावाने जवळपास 6 हजार करोड एवढी होते. या 6 हजार किमतीच्या घरात 600 कर्मचारी आहेत. जे अहो रात्र या घरची देखभाल करतात. हे सर्व कर्मचारी या घरातच राहतात.

मजबुती

मुकेश अंबानींच्या अँटिलिया (Antilia) ची उंची जवळपास 170 मीटर म्हणजेच 560 फूट एवढी आहे. सामान्य बिल्डिंग मध्ये एवढ्या उंचीमध्ये 60 माजले बांधले जातात. पण अँटिलिया मध्ये फक्त 27 च मजले बांधले गेले आहेत. याच कारण आहे या घरात सामान्य पेक्षा जास्ती उंचीचे सिलिंग आहेत. हा घर जवळपास 48 हजार स्क्वेयर फुटामध्ये पसरले आहे. जे एक हजार एकर पेक्षा जास्ती जागा घेरले आहे. या घराला असे बनवण्यात आले आहे की हा जास्तीत जास्ती 8 रेक्टर स्केल एवढं क्षमतेचे भूकंपाचे झटके सहन करू शकतो.

सोयी सुविधा

हे घर साउथ मुंबई च्या “ऑफ पेडर रोड” वरुन “अल्टामाउंट रोड” वर स्थित आहे. अटलांटिक महासागराचा एका पौराणिक द्वीपाचा नावावर याचं नाव अँटिलिया असे ठेवण्यात आले आहे. या घराला शिकागो मधील आर्किटेक्ट “पार्किंन्स” यांनी डिजाईन केलं आहे. पण त्या डिजाईन ला सत्यात उतरवण्याच काम हे एका ऑस्ट्रेलियन कंस्ट्रक्शन कंपनी “लैग्टोंन होल्डिंग” ने केलं. अँटिलिया मध्ये 6  मजले हे फक्त आणि फक्त मागड्या कार्स साठी राखीव ठेवलेले आहेत. शिवाय यात 168 कार्स थांबतील एवढी जागा आहे. सातव्या मजल्यावर या कार्स साठी विशेष सर्व्हीस स्टेशन देखील बनवले गेले आहे. शिवाय घराचा छतावर 3 मोठे हेलिपॅड उभारलेआहेत.
अँटिलिया मध्ये 9 लिफ्टस असून , एक स्पा, एक मंदिर एक सोन्याची कलाकुसर असलेलं आणि फक्त   चैण्डेलयर प्रकारचा काचेपासून बनवलेलं एक बॉल रूम, सोबत एक प्राइवेट सिनेमा गृह, एक योगा स्टूडियो, एक आइसक्रीम रूम, 2 किंवा तीन पेक्षा जास्ती  स्विमिंगपुल देखील यात आहेत. या शिवाय या घरात आर्टिफिशियल बर्फा पासून बनवलेलं रूम पण आहे. या सर्व गोष्टीना चार चांद लावण्यासाठी एक सुंदर हँगिंग गार्डन देखील यात बनवलेले गेले आहे











- by http://marathimotivation.in/

व्हाट्सअप्प बणवणाऱ्या जान कोउम ची कहाणी | story of whatsapp founder jan koum

जान कोऊम

नकारात्मक लोकांना कुठल्या हि संधी मध्ये काहीना काही अडचण दिसते, तर सकारात्म लोकांना अनंत अडचणीत देखील संधी दिसत असते. आज आपण अशाच एका सकारात्म व्यक्ती बदल माहिती घेणार आहोत. ज्याचा आयुष्यात अन्न पाण्या सारख्या मूलभूत गोष्टींसाठी देखील संघर्षच लिहलं होत. त्यात त्या माणसाने जिद्दीच्या जोरावर आयुष्यातील खाच खळगे भरत, अमेरिका मधील सर्वात श्रीमंत व्यक्तींचा यादीत आपले नाव शामिल केलं.
आज आपण व्हाट्सअप ला बनवणाऱ्या जान कोउम( jan koum) बद्दल माहीती घेणार आहोत. ज्या जान कोउम ला फेसबुक ने त्याचा क्षमतेवर बोट ठेवून नौकरी नाकारली, त्याच फेसबुक ला कोउम ने त्याने तयार केलेला व्हाट्सअप 19 बिलियन डॉलर्स मध्ये विकले. ही रक्कम भारतीय करन्सी मध्ये जवळपास 1 लाख करोड एवढा होतो.

सुरुवातीचा काळ

कोउम च जन्म हे युक्रेन मध्ये झालं होतं. त्याचे वडील बांधकाम मजूर होते. तर आई एक गृहिणी होती. त्याचं आयुष्य खूप खडतर होते. ते 2 वेळच्या अन्न पाण्यासाठी देखील ते महाग होते. त्या वेळी युक्रेन मध्ये वातावरण खूप अस्थिर होत. मग त्यांनी युक्रेन सोडून अमेरिका मध्ये आश्रय घेण्याचा निर्णय घेतला.
जान फक्त 16 वर्षाचा असताना त्याचा कुटूंबानी माउंटन व्हिएव (mountain view) कॅलिफोर्निया येथे स्थलांतर केलं. त्यांना एका सामाजिक संस्थेने त्यांना दोन खोल्यांचं एक लहान घर देऊ केलं होतं. ईथे देखील त्यानां खूप संघर्ष करावा लागला. घर चलवण्या साठी कोउम च्या आईने घरातच बेबी सीटर काम करायला सुरुवात केली. जान कोउम देखील पेपर टाकणे, दुकानातील फारश्या पुसणे इत्यादी कामे करून आईला आर्थिक मदत केली. या काळात कोउम ला तासंतास जेवण मिळवण्या साठी अन्नछत्रा बाहेर उभे राहावे लागत.
पण म्हणतात ना वेळ चांगला असो किंवा वाईट ते नक्की बदलत असते. जान कोउम चे देखील दिवस हळू हळू बदलत होते. त्याने 19 वर्षी एक कॉम्प्युटर विकत घेतला त्याला प्रोग्रामिंग ची आवड होती. तो सर्व काही पुस्तके वाचून स्वतः शिकला होता. त्यांने काही दिवस एका हॅकर ग्रुप WooWoo मध्ये हॅकर म्हणून ही काम केलं आहे.
पुढे कोउम ने सॅन जोश स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन घेतलं. त्या सोबत एर्णस्ट अँड यंग (Ernest and Young) या कंपनीत रात्री सिक्युरिटी टेस्टर म्हणून जॉब करत असे. शिक्षणा नंतर त्याने yahoo येथे जॉब करायला सुरुवात केली येथेच त्याला एक मित्र मिळणार होता ज्याचा सोबत तो इतिहास रचणार होता.

ब्रायन ऍक्टन सोबत ओळख

Yahoo मध्ये कोउम ने 10 वर्षा काम केलं आहे. त्या काळात त्याला ब्रायन ऍक्टन (Brian Acton) नावाचा जिवलग मित्र मिळाला, तो yahoo मध्ये advertising सिस्टीम सांभाळत असे. त्यांचे एक दुसऱ्या सोबत खूप जास्ती पटत असे. या काळात ते एकमेकांचे खूप जिवलग मित्र झाले. नंतर कोउम आणि ऍक्टन दोघानी स्वतःच स्टार्टअप सुरु करायच विचार केला. फेसबुक आणि ट्विटर सारखं मोठं निर्माण करण्याचा ध्येयाने त्यांनी 2007 साली yahoo कंपनीला ला राजीनामा दिला.

पहिला वर्ष त्यांना काहीच जमले नाही. त्यांचा कडे असलेले पैसे हळू हळू संपत होते. निराश होऊन त्यांनी परत जॉब करायचं ठरवलं. त्यांनी फेसबुक आणि ट्विटर मध्ये जॉब साठी अप्लाय हि केला. पण इंटरविव्ह मध्ये त्यांना नाकारण्यात आले. कोउम आणि ऍक्टन दोघानी हा काळ खूपच अवघड असल्याचं ट्विर च्या माध्यमातून सांगितलं होतं.
पण कोणीतरी महान व्यक्तीने म्हंटले आहे की
सध्या तुमच्या जीवनात कठीन काळ असेल तर समजुन घ्या येणार काळ त्या प्रेक्षा कठीण असेल पण त्या नंतर मात्र सर्व चांगले आणि सोप्पे असेल.
त्याच प्रमाणे कोउम आणि ऍक्टन यांचं होतं. कोउम ने 2009 मध्ये अप्पल चा i-phone घेतला. आणि त्याला फक्त 7 महिने जूणा अँप स्टोर च्या क्षमते ची कल्पना आली. त्याला कळाले की मोबाईल ऍप्प तयार करणे खूप फायदाचे होऊ शकते.

whatsapp चा जन्म

कोउम ला त्याचा एका रशियन मित्राने इस्टंट मेसेजिंग ची कल्पना सुचवली. बाजारात इन्स्टंट मेसेजिंग ऍप्पस होत्या, जसे ब्लॅकबेरी मेसेंजर इत्यादी पण ते फक्त ब्लॅकबेरी च्या मोबाईल पुरतेच मर्यादित होत्या. नेमके हेच कोउम ने हेरले, त्याने कोणत्या ही फोन वर चालेल असा इन्स्टंट मेसेजिंग ऍप बनवायचं ठरवलं. त्याने तयार केलेल्या ऍप्प साठी whatsapp हे नाव नक्की केलं, आणि 24 फेब्रुवारी 2009 मध्ये कॅलिफोर्निया येथे स्वतःची whatsapp.inc कंपनी स्थापन केली.
सुरुवातीचा एक वर्ष व्हाट्सअप्प ला अपेक्षा प्रमाणे यश मिळाले नाही. कोउम हा परत निराश होऊन व्हाट्सअप्प बंद करण्या बाबत ऍक्टन कडे बोलणी केली. ऍक्टन ने त्याला आणखी एक वेळा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला, आणि झालेही तसंच वापरण्यास सोप्पे आणि एकही जाहिरात नसलेला ऍप म्हणून व्हाट्सअप्प प्रसिद्धीस येऊ लागला. तो एवढा प्रसिद्ध झाला की फक्त 3 वर्षातच ऍप्पल च्या ऍप्प स्टोर मध्ये सर्वात जास्ती डाउनलोड केला जाणारा ऍप्प बनला. व्हाट्सअप्प आणि कोउम दोघांचे दिवस फिरले.
स्थापनेच्या फक्त 5 वर्षी नंतरच व्हाट्सअप्प ने यशाचे मोठे मोठे शिखर सर केले होते. अखेर फेसबुक च्या संस्थापक मार्क झुकरबर्ग याने व्हाट्सअप साठी 19 बिलियन डॉलर ची ऑफर कोउम कडे ठेवली. 19 बिलियन म्हणजे जवळपास 1 लाख 19 हजार करोड रुपये होतात. शिवाय व्हाट्सअप्प च्या मुख कार्यकारी मंडळा वर कोउमलाच ठेवण्याचा आश्वासन दिले गेले तेंव्हा कुठे कोउम ने 19 बिलियन डॉलर मध्ये व्हाट्सअप्प फेसबुक कंपनी ला विकायचं निर्णय घेतला. आणि गंमत म्हणजे या फेसबुक ने कोउम याला नौकरी नाकारली होती.


त्याने फेसबुक च्या ऑफर वर सही करण्यासाठी तेच ठिकाण निवडले जिथे, त्याने आयुष्यात सर्वात जास्ती कष्ट घेतलं होतं. जिथे त्याला तासंतास अन्ना साठी थांबावं लागलं. त्याचं कॅलिफोर्निया येथील अन्न छत्रात त्याने फेसबुक च्या करारावर सही केली. जान आता जरी श्रीमंत झाला असला तरी तो त्याचे गरिबीतले दिवस विसरला नाही.

 मित्रांनो आयुष्य असच असते. हजार कष्ट असले तरी आपले दिवस कधी ना कधी येणार या वर विश्वास ठेवायचं असते. यश मिळवण्यासाठी फक्त आणि फक्त एकच गोष्ट महत्वाची वाटते मला ती म्हणजे मैदानात टिकून राहणे बाकी सर्व ऑटोमॅटिक होतं .





by - marathi motivation

माझ्याबद्दल