सोमवार, ५ डिसेंबर, २०१६

जयललिता यांचा चित्रपटसृष्टी ते राजकारणापर्यंतचा प्रवास


     
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - जयललिता यांचा राजकारणात येण्यापूर्वी चित्रपटसृष्टीतही नावलौकिक होता. आईच्या आग्रहाखातर जयललिता या अभिनय क्षेत्राकडे वळल्या. 'वेन्निरा अडाइ' या तमीळ चित्रपटात आघाडीची भूमिका निभावल्यानंतर जयललिता यांची चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून कारकिर्दीला सुरुवात झाली. जयललिता यांनी 15 वर्षांच्या वयापासून तामिळ आणि तेलुगू मिळून जवळपास दीडशे चित्रपटांत काम केले. जयललिता यांनी हिंदी चित्रपट 'इज्जत'मध्येही काम केलं होतं. या चित्रपटात जयललितांसोबत धर्मेंद्र सहकलाकार होते.
राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी जयललिता हे तमीळ चित्रपटसृष्टीत आघाडीचं नाव होतं. मरुधुर गोपालन् रामचंद्रन ( एमजीआर ) हे जयललितांचे गुरू होते. जयललिता यांनी काही चित्रपट हे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि सुपरस्टार एम. जी. रामचंद्रन यांच्याबरोबर देखील केले आहेत. एमजीआर यांच्या निधनानंतर जयललिता 1987मध्ये पूर्णतः सक्रिय राजकारणात उतरल्या. एमजीआर यांच्या अंत्ययात्रेदरम्यान एमजीआर यांची पत्नी आणि जयललिता यांच्यात मतभेदही झाले. त्यामुळे पक्ष फुटीच्या उंबरट्यावर असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. मात्र त्यानंतर जयललिता यांनी मजबूतपणे पक्षाची कमान सांभाळली.
अल्पावधीतच जयललितांकडे एमजीआर यांचे राजकीय वारसदार म्हणून पाहिलं जाऊ लागलं. जयललिता यांचं राजकारणातील महत्त्व वाढलं आणि 1991 साली जयललिता जानकी रामचंद्रन यांच्यानंतर तामिळनाडूच्या दुसऱ्या महिला मुख्यमंत्री झाल्या. 1996च्या विधानसभा निवडणुकीत जयललिता यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. तरीही त्यांचा राजकारणातला दबदबा कायम राहिला. जयललिता यांनी अनेक वर्षं तामिळनाडूच्या राजकारणात वर्चस्व गाजवलं. जयललिता यांनी 1991-96, 2001, 2002-06, 2011-14 आणि 2015ला तामिळनाडू राज्याचं मुख्यमंत्रिपद सांभाळलं आहे.
आताचे राजकीय शत्रू असलेले 92 वर्षांचे करुणानिधी हे एकेकाळी एमजीआरचे जीवलग मित्र होते. त्यांनी एमजीआर यांच्या चित्रपटासाठी कथा-संवाद लिहिले. एमजीआर ज्या प्रकारे संवादफेक करत होते, त्याला सर्वसामान्य प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत होता. एमजीआरच्या मृत्यूनंतर तामिळनाडूत आलटून पालटून जयललिता (अम्मा) आणि करुणानिधी सत्तेवर येत असतात. अण्णादुराई यांनी स्थापन केलेल्या मूळ डीएमके पक्ष विभाजीत झाला आणि एआयएडीएमके पक्षाच्या जयललिता सर्वेसर्वा झाल्या. डीएमके आणि एआयएडीएमके या दोन्ही पक्षांच्या ध्येयधोरणांत काहीच फरक नाही. तरीसुद्धा तामिळनाडूमध्ये एखादा तिसरा पक्ष या दोन्ही पक्षांपुढे तग धरू शकत नाही, हेही तितकेच खरे आहे.


अभिनेत्री ते मुख्यमंत्री:असा घडला मुख्यमंत्री जयललिता यांचा जीवनप्रवास



Tuesday, December 06th, 2016
jayalalithaa-actress-cm
सामना ऑनलाईन । चेन्नई
केवळ दक्षिणेकडेच नाही तर एकूणच भारतीय राजकारणात प्रभावी व्यक्तीमत्व म्हणून मुख्यमंत्री जयललिता यांची ओळख आहे. त्या ऑल इंडिया अन्ना द्रविड मुन्नेत्र कळ्हघम पक्षाच्या सरचिटणीसही होत्या. ताप आणि डायरियाने गेले महिनाभर आजारी असलेल्या त्यांच्यावर चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.  ५ डिसेंबर रोजी रात्री ११.३० वाजता त्यांचं निधन झालं.
जयललिता यांचा आजवरचा जीवनप्रवास नाट्यमय राहिला आहे. त्याविषयी ही खास माहिती.
>> त्यांचे पूर्ण नाव जयललिता जयराम अय्यर. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९४८ला तत्कालिन म्हैसूर राज्यात मेलूरकोट, ता. पांडवपुरा येथे एका अय्यर परिवारात झाला. त्या दोन वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या आईने त्यांना घेऊन बंगळुरू गाठले. तेथे त्यांच्या आईने ‘संध्या’ या नावाने चित्रपटांमध्ये कामाला सुरुवात केली. नंतर जयललिता यांनाही चित्रपटात काम करण्यासाठी आईने राजी केले.
> जयललिता यांचा अभिनेत्री ते मुख्यमंत्री हा प्रवास तसा संघर्षाचाच म्हणावा लागेल. आपल्या चार दशकांच्या राजकीय प्रवासात त्यांनी अनेक चढउतार पाहिले. अण्णाद्रमुकचे संस्थापक नेते एम.जी. रामचंद्रन यांच्या त्या जवळच्या समजल्या जात.
>> जयललिता यांनी वयाच्या १५ व्या वर्षी चित्रपट अभिनेत्री म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. विद्यार्थीदशेत शिक्षणाची त्यांना विशेष आवड होती.
> त्यांनी एमजीआर यांच्यासोबत २८ चित्रपटांत काम केले. एमजीआर तामिळ चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार म्हणून ओळखले जात. तसेच ते प्रभावी राजकीय व्यक्तीमत्वही होते. त्यांनी अनेक तमिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटामधून अभिनय केलेला आहे.
>> त्यानंतर चित्रपटसृष्टीला राम राम करून जयललितांनी राजकारणाच्या जगात प्रवेश केला. १९८३ मध्ये एम. करुणानिधी यांच्या द्रमुक पक्षाशी फारकत घेतल्यानंतर एमजीआर यांनी अण्णाद्रमुक पक्षाची स्थापना केली. त्यावेळेस जयललिता यांची पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच राज्यसभेसाठीही त्यांचे नामांकन करण्यात आले.
>> त्याच दरम्यान जयललिता यांचे एमजीआर यांच्याशी बिनसल्याच्या बातम्या येत होत्या. परंतु १९८४ च्या पक्ष प्रचार अभियानाचे जयललिता यांनी नेतृत्व केले होते.
>> जयललितांचा राजकारणात संपूर्ण उदय झाला, तो १९८७ ला. एमजीआर यांचे निधन झाल्यानंतर. एमजीआर यांच्या अंत्ययात्रेत त्यांची पत्नी आणि समर्थकांनी जयललिता यांच्यासोबत कथित गैरव्यवहार केल्याचे सांगितले गेले. त्यातून या पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले.
>> मात्र त्यानंतर राजकारणात ठाम राहिल्याने आणि जनतेच्या मनातील राजकीय पकड घट्ट केल्यामुळे जयललिता १९९१ मध्ये पहिल्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री बनल्या. नंतर झालेल्या ९६ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना पराभवला सामोरे जावे लागले. पण तोपर्यंत राजकारणातील ‘जानी मानी हस्थी’ म्हणून त्यांचे नाव झाले होते.
>> २००१ मध्ये त्या पुन्हा तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या. मात्र त्यानंतर थोड्याच कालावधीत त्यांना हे पद सोडावे लागले.
>> पुढे २०११ मध्ये त्या पुन्हा निवडून आल्या त्यानंतर आतापर्यंत त्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदी विराजमान आहेत. २०१६ मध्ये ऐतिहासिक विजय मिळवून त्या पुन्हा मुख्यमंत्री झाल्या.
>> उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमा केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर दोषारोपपत्र सिद्ध झाले. त्यानंतर २७ सप्टेंबर २०१४ मध्ये बंगळूरुच्या एका कोर्टाने त्यांना चार वर्षांची शिक्षा सुनावली होती.
>> त्यांना शिक्षा झाल्यानंतर तामिळनाडूत भयानक हिंसा आणि अशांतता पसरली होती.
>> मध्यंतरी जयललिता यांच्या अनुपस्थितीत पनीर सेल्वम यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून काम पाहिले. पण ते जयललिता यांच्याशी इतके एकनिष्ठ होते की त्यांनी त्यांचे कार्यालय किंवा विधानसभेतील खूर्चीचा कधीही वापर केला नाही





- See more at: http://www.saamana.com/desh-videsh/jayalalithaa-an-actress-to-cm-life-journey#sthash.mcY2Z23m.dpuf

शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०१६

महाराष्ट्राचे आधुनिक शिल्पकार...

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक आणि भारतीय घटनाकार कै. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर भारताचे आणि महाराष्ट्राचे खंबीर नेतृत्व करणारे नेते, महाराष्ट्राचे शिल्पकार, पहिले मुख्यमंत्री आणि माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण यांची दि. 25 नोव्हेंबर 2016 रोजी (आज) 32 वा स्मृतिदिन. त्यानिमित्त....मराठी भाषेतील दोन काव्य ओळी फारच समर्पकपणे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनाला लागू होतात.
जन्मा येणे दैवा हाती
करणी जग हासवी!



सातारा  जिल्ह्यातील देवराष्ट्रे या खेड्यात एका शेतकरी कुटुंबात 12 मार्च 1913 रोजी त्यांचा जन्म झाला. चौथ्या वर्षी पितृछत्र हरपले. प्राथमिक शिक्षण देवराष्ट्रेत झाले. तर माध्यमिक शिक्षण कराड येथील टिळक हायस्कूलात अनेक अडचणीतून झाले. तर एल. एल. बी. चे शिक्षण पुण्यातील लॉ कॉलेजात झाले. त्यांच्या आई विठाबाई यांनी त्यासाठी अपार कष्ट घेतले. यशवंतरावजी वयाच्या सोळाव्या वर्षी भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. 1942 च्या आंदोलनात त्यांनी सारा सातारा जिल्हा उतरविला होता. 1947 साली स्वराज्य मिळाल्यानंतर काही काळ सातारा येथे वकिली करून ते 1952 पासून पूर्ण वेळ राजकारणात उतरले. द्वैभाषिक महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काही काळ पुरवठा मंत्री, त्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काही पुरवठा मंत्री, त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून 1956 ते 1960 त्यांनी काम केले, तर संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीवर ते स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. 1962 ते 1984 एवढा प्रदीर्घ काळ ते भारताचे संरक्षण, गृह, अर्थ, परराष्ट्र आणि व्यवहारमंत्री होते. तर काही काळ विरोधी पक्ष नेते, भारताचे उपपंतप्रधान होते. वय वर्षे सोळा ते वय वर्षे एकाहत्तर इतका काळ म्हणजे सुमारे साठ वर्षे देशसेवेत होते. यावरून त्यांच्या महान, त्यागी, समर्पित जीवनाची
कल्पना येते.
खंबीर नेतृत्व
सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले यशवंतरावजी अखिल भारतीय नेते झाले. हे त्यांचे असामान्यत्व आहेच. त्याचप्रमाणे संयुक्त महाराष्ट्राचा उदय झाल्यावर नव्या महाराष्ट्राची जडणघडण त्यांनी केली हे त्यांचे महान कार्य आहे. कृषी-औद्योगिक समाजरचना, सहकारातून समाजप्रगती, विविध औद्योगिक वसाहती, सहकारी बॅंका, पतसंस्था, पूरक संस्था यांची उभारणी कोयनानगर सारखी मोठी धरणे व छोटी गाव-शेततळी योजना, जलसंधारण कामे, विभागीय विद्यापीठांची उभारणी लेखकांना उत्तेजन आणि पुरस्कार योजना, साहित्य संस्कृती मंडळ निर्मिती, विश्वकोष निर्मिती मंडळ, अशी चौफेर दृष्टी ठेवून केेलेली रचनात्मक कामे हे स्व. यशवंतरावजींचे कार्य कर्तृत्व आहे. निर्मितीक्षम प्रतिभा आहे. सामान्य लोकांचा समाजकारणात, राजकारणात सहभाग असावा म्हणून पंचायतराज, जिल्हा परिषद निर्मिती, स्थानिक नेतृत्वाला संधी व कार्यकर्तृत्वाचे डोंगर उभा करण्याचे आव्हान हे सारे यशवंतरावांनी आपल्या कार्यकाळात करून घडवून दाखविले. ही त्यांची महाराष्ट्राला मोठी देणगी आहे. त्यामुळे जिल्ह्या-जिल्ह्यातून कर्तबगार नेतृत्वाचा उदय झाला आणि पुढे तेच महाराष्ट्राचे राज्यकर्ते बनण्याची एक अखंड साखळी तयार
झाली, होत आहे. याचे सारे श्रेय
स्व. चव्हाणसाहेबांनाच आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रातील कर्तबगार माणसे हाताशी धरून त्यांनी महाराष्ट्राची जडण-घडण केली. देशात महाराष्ट्र विकासाच्याबाबतीत सर्वप्रथम राहील याची दक्षता त्यांनी घेतली. म्हणूनच आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण हे आहेत. त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गाने आज महाराष्ट्र विकासाची घोडदौड करीत आहे हे त्यांचे द्रष्टेपण आहे.
भारताचे पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांनी भारतावर चीनने विश्वासघातकी आक्रमण केल्यावर देशातील एक कणखर नेता म्हणून संरक्षणमंत्रीपदी स्व. यशवंतराव यांनाच बोलावले आणि त्यांनी आपली कर्तबगारी दाखविली. 1965 साली पाकिस्तानची कुरापत काढल्यावर, तत्कालीन विमानदलप्रमुख एअरचीफ मार्शल अर्जुनसिंग यांना बॉंबफेकीची आदेश दिला आणि पेशावरपर्यंत भारतीय सैन्य गेले. ही आठवण नुकतीच मुंबई येथे झालेल्या स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी समारंभात अर्जुनसिंग यांनी सांगितली. तेव्हा चव्हाणसाहेबांच्या कणखर निर्णय घेण्याच्या क्षमतेची कल्पना आली. 1962 ते 1994 इतका प्रदीर्घ काळ ते केंद्रात मंत्री होते. दिल्लीत त्यांनी महाराष्ट्राचा दबदबा निर्माण केला होता. महाराष्ट्र या नावातील शक्ती देशाला दाखवून दिली. यामागे त्यांचा सखोल अभ्यास, निर्णयक्षमता, परिश्रम, प्रखर देशभक्ती व लोकहितदृष्टी होती. ते उत्तम वक्ते होते. वाचक होते आणि शैलीदार लेखकही होते. "सह्याद्रीचे वारे', "शिवनेरीच्या नौबती', "युगांतर', "ऋणानुबंध', "भूमिका', "कृष्णाकाठ' मिळून बारा पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. त्यांच्या संग्रहात विविध भाषांतील सुमारे वीस हजार पुस्तके होती. इतका बहुश्रुत नेता, लेखक, वक्ता, वाचक आणि सहृदयी माणूस राजकारणात सापडणे कठीण आहे. देशात आणि महाराष्ट्रात संस्थात्मक, रचनात्मक कामाचे मानदंड यशवंतराव चव्हाण यांनी निर्माण केले आहेत. खरे तर त्यांनी व त्यांच्या पत्नी सौ. स्व. वेणूताई चव्हाण यांनी देशाचा संसार केला. इतके ते देशमय, समाजमय होऊन गेले होते. त्यांची जडणघडण हा एक स्वतंत्र ग्रंथाचाच
विषय आहे.
समन्वयाची भूमिका
स्व. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राला लाभलेले मोठे द्रष्टे नेते होते. भारताचा, महाराष्ट्राचा त्यांचा सामाजिक अभ्यास चिकित्सक म्हणता येईल असा होता. 1966 साली ते पुण्यातील अनाथ हिंदू महिलाश्रमाच्या रौप्यमहोत्सवासाठी सन्मानीय पाहुणे म्हणून आलेले होते. मी साप्ताहिक साधनाचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित होतो. समारंभातील प्रारंभिक भाग संपल्यावर ते भाषणास उभे राहिले. प्रारंभी त्यांनी संस्थेच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले. त्यानंतर त्यांनी जी वैचारिक मांडणी केली, त्यामुळे उपस्थित सर्वच मंडळी अंतर्मुख झाली. त्यात दलितदास्य, स्त्रीदास्य आणि शेतकरीदास्य याची त्यांनी कठोर मीमांसा केली आणि शेवटी त्यांनी जी विनंती केली, त्यामुळे कोणालाही साधे टाळ्या वाजविणेच जमले नाही. ते म्हणाले, आपल्या समाजात अनाथ महिलाश्रमाचा सुवर्ण, रौप्यमहोत्सव होत असेल तर आपण स्त्रीला आहे त्या ठिकाणीच शतकानुशतके ठेवले आहे. आपल्या सुधारलेल्या समाजात स्त्री अनाथ राहते हेच मोठे आश्चर्य आहे. मी कार्यकर्त्यांना आवाहन करतो की सामाजात अशी स्थिती आणू या की स्त्रीसाठी महिलाश्रमाची आवश्यता भासणार नाही. लवकरच समाज स्त्रीला आधार देऊ लागल्याने हा अनाथ महिलाश्रम बंद करावा लागला, अशी स्थिती येऊ दे. त्या समारंभाला मला जरूर बोलवा, मी जरूर येईन. दुसरा प्रसंग आठवतो. बालगंधर्व नाट्यगृहात कर्मवीर वि. रा. शिंदे जन्मशताब्दी समारंभाचा सांगता समारंभ होता. ते सन्मानीय पाहुणे होते. व्यासपीठावर समाजवादी नेते नानासाहेब गोरे उपस्थित होते. स्व. यशवंतरावांच्या भाषणापूर्वी गोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात शेवटी यशवंतराव यांच्याकडे हात करून ते म्हणाले, जातीभेद संपत नाही, वर्णभेद संपत नाही, अन्याय संपत नाही तर हे स्वराज्य कसले यशवंतराव बोला ना? तुमचे हात स्वराज्यात कोणी धरलेत? सांगाना टाळ्यांचा मोठा कडकडाट झाला. यशवंतराव शांतपणे उभे राहिले, त्यांनी समाजप्रबोधनाचा शंभर वर्षाचा इतिहास मार्मिक भाष्य करीत उभा केला. नानासाहेब गोरे यांच्याकडे हात करून ते म्हणाले, नानासाहेब माझे आणि तुमचे अर्धशतक समाज जात वर्ग विरहित एक करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण आपले हात प्रतिगामी लोकांनी प्रयत्न करूनही समता येत नाही. त्यांचे हात कोणी धरलेत? याचा अर्थ आपणा सर्व प्रागतिक विचारी लोकांचे हात कठोर परंपरेने धरलेत. महर्षी वि. रा. शिंदे यांनी प्रहार केले. समाज थोडा हलला. आपणही प्रहार करू या. समाज बदलेल. केवळ सत्ताक्रांतीने समाजक्रांती होत नसते. समाज क्रांती समाजानेच करावयाची असते. आपण या कठोर समाज मनाला धक्के मारत राहू या. स्व. यशवंतराव हे केवळ राजकीय नेते नव्हते. समाजकारण, अर्थकारण, साहित्यकारण आणि राजकारण यासाठी लागणारी चौफेर अभ्यासू, विवेकदृष्टी त्यांच्याजवळ होती. ते स्वत: उत्तम लेखक तर होतेच, पण नव्या लेखकांनाही त्यांनी सातत्याने प्रोत्साहन दिले. अनेक नव्या कथा, कादंबरी, वैचारिक लेखांचे संग्रह, कविता, ऐतिहासिक ग्रंथांना त्यांनी लिहिलेल्या चिकित्सक प्रस्तावना मराठी साहित्याचे लेणे ठरल्या आहेत. आयुष्यभर त्यांनी प्रचंड लोकसंग्रह केला. लहान मोठा असा भेदभाव त्यांच्याकडे नव्हता. प्रतिकूल परिस्थितीशी झुंजतच त्यांनी शिक्षण घेतले होते. मातोश्री श्रीमती विठाबाईंचे संस्कार त्यांच्यावर होते. त्यामुळेच सत्तेवर असतानाही त्यांना कधीही गरीब आणि शेतकऱ्यांचा विसर पडला नाही. त्यांच्या सुखदु:खाशी एकरूप झालेला हा नेता होता. ते सर्वार्थाने लोकांचे नेते होते. त्यांना विनम्र अभिवादन!




- डॉ. श्रीपाद जोशी, जत (सांगली) 

मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०१६

इतिहास चलनावरील बंदीचा ....



currancy1
नवी दिल्ली:  मोदी सरकारने काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला असून या निर्णयाअंतर्गत आता ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून बंद करण्यात आल्या आहेत. ५० दिवसांचा कालावधी नागरिकांना या नोटा बदलण्यासाठी देण्यात आला आहे, तर काही ठिकाणी या नोटा काही दिवस चालवण्याची मुभाही देण्यात आली आहे. मात्र चलनातील मोठ्या नोटा बंद करण्याचा निर्णय हा पहिल्यांदाच झालेला नाही आहे. याआधीही अनेकदा मोठ्या नोटा बंद करण्याचा निर्णय काही सरकारने घेतला आहे.
१ हजार, ५ हजार आणि १० हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय १९७८ साली मोरारजी देसाई पंतप्रधान असताना त्यांनी घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. भारतात स्वातंत्र्यापूर्वीपर्यंत म्हणजे १९४६पर्यंत १० हजार रूपयांची नोट होती. नंतर ती बाद करण्यात आली. १९४७मध्ये देश स्वतंत्र झाला व पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील सरकार आले. या सरकारने १९५४ साली १० हजार रूपयांची नोट पुन्हा चलनात आणली सोबतच ५ हजार रूपयांची नोटही चलनात आणली. १९७८पर्यंत या नोटा चलनात होत्या. मार्च १९७७ मध्ये मोरारजी देसाई यांचे सरकार आल्यावर या सरकारने लगेच १९७८ मध्ये ५ हजार आणि १० हजारांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता

सोमवार, १० ऑक्टोबर, २०१६

शिवकालीन आर्थिक नियोजन



राज्याचा कोषागार जर संपन्न व भरलेला असेल तर त्या राज्याची प्रगती निश्‍चितच होते. कोषागार हा नेहमी प्रगतिपथावर नेणारा असल्यास राज्याची व रयतेची नक्कीच आर्थिक स्थिती सुधारते. लढाईमध्ये गनीमाचे हस्तगत केलेले सर्व मुद्देमाल कोषागारात जमा करणे हा मराठी फौजांचा शिरस्ता होता आणि म्हणूनच शिवकालीन राज्य प्रगतिपथावर होते. आर्थिक सुबत्तेकरिता कास्तकार व शिलेदार यांना मध्यबिंदू मानून छत्रपती शिवरायांनी अर्थकारण केले.

हिंदुस्थानचा इतिहास नजरेखालून घातल्यास स्पष्टपणे जाणवते की, छत्रपती शिवाजी महाराजांनी आर्थिक सुबत्तेसाठी उद्योगावर जितका भर दिला तितका इतर शासनकर्त्यांनी दिला नाही. राज्याचे कोषागार नेहमी श्रीमंत असावे म्हणून प्रजेचा आर्थिक छळ न करता योग्य व माफक साराभरती व करवसुली झाली पाहिजे, अशी सक्त ताकीद महाराजांनी चिटणीसांना दिली होती. शेती व राष्ट्राचा मुख्य उद्योग म्हणून शेतकी तंत्रज्ञान विकसित व्हावे या हेतूने महाराजांनी दादोजी कोंडदेवांना पाहणी करण्यास सांगितले होते. महसूल विभागाला पिकाचे रास्त मोजमाप करून न्यायोचित करवसुली करावी, असा दंडक घालून दिला होता. मुलूखगिरीवर वचक बसवून उभ्या पिकाचा नाश करणार्‍या सैनिकांना जेरबंद करून शिवाजी महाराजांनी सजा फर्मावली. शिलंगणाचे सोने लुटून आल्यावर त्याच शेतकर्‍याला शिलेदार (मावळा) बनवून मुलूखगिरीवर जाण्यास प्रवृत्त करणारे शिवराय माणसाचा जास्तीत जास्त उपयोग कसा करून घेता येईल याबाबत प्रयोगशील होते. या योजनेमुळे रयतेस दरसाल उत्पन्न मिळे व पावसाळ्यात सैन्य माफक व अत्यल्प बाळगल्याने कोषागाराचा आर्थिक ताण कमी होई. यालाच आज उद्योग व्यवहारात कुशल मनुष्यबळाचा पुरेपूर वापर, असे एचआरडीवाले म्हणतात.

राज्याभिषेकप्रसंगी इस्ट इंडिया कंपनीचा दूत हेन्री ऑझ्किडन याचा नजराणा स्वीकारताना शिवप्रभूंनी इंग्रजांना सक्त आदेश दिला होता की, इंग्रजी गलबते मराठ्यांच्या सागर हद्दीच्या चाळीस मैलाबाहेर मुसाफिरी करतील. एतद्देशीय मच्छीमारांस नुकसान करणार नाहीत याची खबरदारी घ्या. हा प्रसंग आहे १६७४ सालातला, त्यानंतर बरोबर तीनशे वर्षांनी केंद्र सरकारने १९७४ मध्ये जो सागरी कायदा केला, त्याचे मूळ या शिकवणीतच होते म्हणावे लागेल. तो आधुनिक सागरी कायदा म्हणजे एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन सी लॉ होय. त्याचाच अर्थ राष्ट्राचा व्यापारउदीम, संपत्ती संरक्षण व अर्थनियोजन याबाबत महाराजांचे विचार व योजना काळाच्याही फार पुढे आणि म्हणून समृद्ध व प्रगल्भ होत्या.
एका पोर्तुगीज अंमलदाराने त्यांच्या राजाला लिहिलेल्या गुप्तपत्रावरून प्रकाशात आले आहे की, १६५९ मध्ये छत्रपतींच्या मराठा आरमारात केवळ २८ जहाजे होती, पण जंगी बेड्यात (नेव्हल फ्लीट) राज्याभिषेकप्रसंगी १६७४ मध्ये ७४ युद्धनौका खडी तालीम देत सागरात गस्त घालत होत्या. 
हिंदुस्थानच्या इतिहासात जे प्रमुख शास्ते झाले, त्यात सागरी आरमारी बळाचे महत्त्व शिवरायांनी ओळखून नौसेनेची जी उभारणी केली, ती फारच मोलाची होती. शिवरायांपूर्वी केरळात डच, पोर्तुगीज यांच्याविरुद्ध कुंजाली राजे आरमार उभारून १०० वर्षे लढले खरे, पण ते प्रयत्न दिशाहीन व असंघटित होते. शिवरायांनी मात्र जाणीवपूर्वक व योजनाबद्ध आरमार उभे केले. जहाजबांधणी उद्योगात वारली, कातकरी या मागास जातींना गुंतवून महाराजांनी आदेश काढला की, गोर्‍या टोपीकरांकडून जहाजबांधणी कला आत्मसात करून त्यात देशी बांधणीचा अपूर्व मिलाफ करा, म्हणजे सेवायोजना आपोआप होऊन आरमाराला बळ प्राप्त होईल. कुलाबा येथे शिवकालीन आंग्रे कुलोत्पन्न तुकोजी आंग्रे यांच्या देखरेखीखाली जहाजबांधणी कारखाना कार्यरत होता. कुलाबा या शब्दाचा अर्थच गोदी होय. या गोदीत शिरब, पाल, गलबत ही अर्वाचीन काळातील जहाजे बांधली जात. हिंदुस्थानातील जहाजबांधणी उद्योगाची ती पहिली पायरी होती.

रत्नदुर्गच्या (रत्नागिरी) दक्षिण अंगाला एक भुयार उत्खननात सापडले. निरीक्षण केले असता समजले की, तो एक तरता तराफा होता. त्याद्वारे जहाजांना युद्ध सुरू असतानासुद्धा किरकोळ डागडुजी करून जायबंदी जहाजे पुन्हा मोहिमेवर रवाना केले जात असे. यालाच फ्लोटिंग डॉक्स फॉर बेस रिपेअरिंग युनिटस् असे आधुनिक काळात संबोधतात. अशा या दुर्गम जलदुर्गावर २-३ टनांच्या प्रचंड तोफा मावळ्यांनी कशा चढविल्या, हे एक कोडेच आहे. याचाच अर्थ शिवरायांचे दळणवळण खाते तंत्रशुद्ध व अद्ययावत होते, हे दिसून येते.

स्वयंभू भौगोलिक महत्त्वामुळे दख्खनचे जिब्राल्टर म्हणून मान्यताप्राप्त रायगडाची शिवरायांनी राजधानी म्हणून निवड केली. या गडावरून देश व कोकण या दोन्ही प्रांतांवर करडी नजर ठेवता येते. या राजधानीची मांडणी करताना प्रथम शिवप्रभूंनी बाजाराची जागा मुक्रर करून गडावर ऐन वख्ताला दाणापाणी कमी पडू नये याची खात्री व सोय करून ठेवली.

या बाजारात सैन्याला रास्त दराने वस्तू मिळून शिबंदीत कमतरता न भासता व्यापारात वृद्धी होऊन स्पर्धात्मक तत्त्वावर उत्तमोत्तम चीजवस्तू प्रजाजनांना मिळतील, अशी व्यवस्था व योजना होती. बारा बलुतेदारांना स्वराज्याच्या सेवेत आणून भूमिपुत्रांना उद्योगधंद्यात उत्तेजन दिले. शस्त्रास्त्रनिर्मिती सुरू केली.

महाराजांनी किल्लेदार व गडकरी यांना काही सुरक्षा सूचना आपल्या आज्ञापत्रातून दिल्या आहेत. ‘गडकरी हो, सावध चित्ताने वर्तणूक ठेवून दुर्गाची निगा राखणे, अंधार्‍या रात्री गडाचे आगळ, कडीकोयंडे कोठारात वातीच्या दिव्याचा वापर न करणे, अन्यथा उंदीर तेलाच्या लोभाने वात पळवताना कोठारास आग लागून स्वराज्याच्या संपत्तीचे नुकसान होईल. याबाबत टाळाटाळ खपवून घेतली जाणार नाही. झाल्यास मुलाहिजा न ठेवता देहदंड.’

अर्वाचीन काळात औद्योगिक सुरक्षिततेवर जो भर दिला जातो, त्याची जाणीव तीनशे वर्षांपूर्वी शिवरायांना होती व स्वराज्यात त्याबाबत जागृती व्हावी व विचाराने महाराज पावले टाकत. सांप्रत काळी शिलेदार व कास्तकार हे दोघेही दुर्लक्षित आहेत. सैन्यकपात व शेतकीला आलेले गौणत्व हे काही भूषणावह नाही. आज हिंदुस्थानला चीन, पाकिस्तान व दहशतवाद या तीन संकटांविरोधात लढा द्यायचा आहे याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.







विनायक श्रीधर अभ्यंकर

(लेखक माजी नौसेना अधिकारी आहेत.)


by - saamanaa

तरुणांसाठी आर्थिक नियोजन ....


सध्याची तरुण पिढी एवढी वेगवान आहे की, प्रत्येक गोष्ट थ्रीजीच्या वेगात साध्य करावी, असे या तरुणाईला वाटते. यामुळेच बहुतेक तरुण स्वत: चुकीची गुंतवणूक करतात किंवा कोणीतरी चुकीचे गुंतवणूक उत्पादन त्यांच्या माथी मारते. संपत्ती एका दिवसात कमावता येत नाही याची जाणीव प्रत्येक तरुणाने ठेवायला हवी. तरुणाईसाठी आर्थिक नियोजन करताना काय लक्षात घ्यावे याबाबत माहिती देत आहोत. यामुळे त्यांच्या आर्थिक जीवनाची चांगली सुरुवात होईल.


1. पैशाचे मूल्य ओळखा : प्रत्येक तरुणाला पैशाची किंमत असावी. कोणत्या तरी उत्पादक कामासाठी आपण जो वेळ देतो त्या बदल्यात आपल्याला पैसे मिळतात याची जाणीव असावी. उदाहरणार्थ -समजा एखाद्याचे मासिक उत्पन्न 50 हजार रुपये असेल तर 25 दिवस म्हणजेच 200 तासांत प्रतितास 250 रुपये कमाई आहे. खर्च करताना आपल्या उत्पन्नाइतके त्याचे मोल आहे का, हे पडताळून पाहा. पैशाची किंमत ओळखा आणि वित्तीय शिस्त अंगीकारा.


2.उत्पन्नाच्या 20 टक्के बचत करा : मासिक उत्पन्नाच्या किमान 20 टक्के रक्कम बचत करायला शिका. वित्तीय शिस्त अंगी बाणवण्याचा हा एक चांगला उपाय आहे. यासाठी अल्प बचत योजना, म्युच्युअल फंडाचे एसआयपी, पीपीएफ आदींपैकी कोणतेही साधन निवडता येईल. गुंतवणुकीपूर्वी त्या साधनांचे फायदे-तोटे जाणून घ्या. गुंतवणुकीसाठी सोपा मार्ग स्वीकारा आणि त्यावर कायम राहा. आमिषाला बळी न पडता बचत खर्च करू नका.

    
3. आपत्कालीन निधी जमवा : महिन्याकाठी मिळणा-या उत्पन्नातून किमान 20 टक्के रकमेची बचत करून किमान तीन महिन्यांच्या उत्पन्नाइतकी रक्कम जमवा. ही रक्कम एका ठिकाणी सुरक्षित ठेवा. संकटकाळात त्याचा वापर करता येईल. नोकरी सोडणे, काढणे किंवा आरोग्यविषयक समस्यांच्या रूपात संकट कोणत्याही मार्गाने येऊ शकते. त्या वेळी आर्थिक चणचण भासणार नाही यासाठी आपत्कालीन निधी (इमर्जन्सी फंड) उपयोगी ठरतो.

    
4. पुरेसे विमा संरक्षण घ्या : बचतीला पुरेशा विमा संरक्षणाचा आधारही हवाच. आर्थिकदृष्ट्या तुमच्यावर कोणी अवलंबून असेल तर आयुर्विमा घ्या. कंपनीकडून भले आरोग्य विमा संरक्षण मिळत असले तरी पर्र्यायी आरोग्य विमा आणि अ‍ॅक्सिडेंट विमा असावा. पर्यायी विमा किती असावा याचे मूल्यांकन करा, मात्र प्रारंभीच्या काळात आपल्या उत्पन्नाच्या 20 पटीइतके विमा संरक्षण असावे.

    
5. कर बचत म्हणजे विमा पॉलिसींची खरेदी नव्हे : कर बचत साधण्यासाठी गुंतवणूक करताना तरुण नेहमी चुका करतात. नवी नोकरी किंवा व्यवसाय करणारा प्रत्येक तरुण विमा पॉलिसी घेऊन कर वाचवतो येतो असे समजून चालतो. विमा उतरवा, परंतु तो जोखमीपुरताच. कर बचत आपोआप साध्य होईल. केवळ कर वाचवायचा आहे म्हणून विमा पॉलिसी खरेदी करणे टाळा.

    
6. शक्यतो कर्ज टाळा : तुमच्या खात्यातील नियमित उत्पन्नाचे आकडे पाहून अनेक बँकांकडून कर्जाच्या ऑफर येतात. जेव्हा आर्थिक उद्देश स्पष्ट नसतो आणि आपल्या गरजांचे स्वरूप आणखी स्पष्ट नसते अशा वेळी अनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी कर्जाच्या जाळ्यात अडकू नका. जोपर्यंत उत्पन्न आणि खर्चाचे योग्य व्यवस्थापन साधता येत नाही तोपर्यंत कोणत्याही स्वरूपाच्या कर्जापासून चार हात दूर राहा. चांगले आणि वाईट कर्ज यातील फरकही माहिती करून घ्या.














by- divya marathi

माझ्याबद्दल