शुक्रवार, ८ जुलै, २०१६

यशाच्या वाटचालीसाठी रॉनी स्क्रूवाला यांचा मोलाचा सल्ला...


मिडिया उद्यमी रॉनी स्क्रूवाला यांनी आपले पुस्तकड्रीम विथ युअर आईज ओपन अॅण्ड आन्त्राप्रेन्यूअर जर्नीमध्ये नमूद केले आहे की, ‘जर अपयश हे उभरत्या उद्यमींच्या रस्त्यातील सगळ्यात मोठी अडचण असेल तर मैदानात ठामपणे उभे राहण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती हीच आपली सगळ्यात मोठी गुणवत्ता आहे.’
रॉनी यांनी दोन दशकाहून अधिक आपल्या जीवनातील अनुभवाने घेतलेले धडे, भले ते दात साफ करण्याच्या ब्रशचे निर्मिती असो किंवा केबल टीव्हीचा व्यवसाय असो किंवा प्रसारण साहित्य आणि सिनेमाच्या स्टुडीओ संबंधित काम असो, सगळ्यांना एकाच पुस्तकाच्या रुपात एक मनोरंजक आणि माहितीपूर्णरुपात जगासमोर सादर केले आहे. त्यांचा विशाल मिडिया समूह यूटीव्ही डिजिटल साहित्य आणि खेळांच्या उत्पादनाच्या क्षेत्रात  सक्रीय आहे.
यूटीव्ही बऱ्याच कालावधीपासून सिनेमाच्या निर्माण प्रक्रियेत सक्रीय आहे. सन १९९७ नंतर त्यांच्या कंपनीने दिल के झरोखे में, लक्ष्य, स्वदेश, रंग दे बसंती, नेमसेक, देव डी, पीपली लाइव्ह, पान सिंह तोमर, नो वन किल्ड जेसिका, डेली बेली, रावडी राठोड, बर्फी, कोय पो चे सत्याग्रह सारखे सफल प्रसिद्ध सिनेमांचे निर्माण केले आहे.



आता आपल्यासेकंड इनिंगमध्ये रॉनी हे भारतात व्यावसायिकतेला एका नव्या रुपात कब्बडी आणि फुटबॉल सारख्या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांचे लक्ष्य आपल्यास्वदेश फाउन्डेशनच्या अंतर्गत येणाऱ्या पाच वर्षात देशभरातल्या गावात राहणाऱ्या दहा लाखाहून अधिक लोकांना चांगले आणि सशक्त जीवन देण्याच्या प्रयत्नात आहेत.
हे पुस्तक फक्तमी हे करून दाखविलेच्या संदर्भात नसूनहे करू शकतोया घोषवाक्यावर आधारित आहे. देशातील सगळ्या तसेच विशेषकरून उभरत्या व्यावसायिकांसाठी आवश्यक पठनीय १८५ पानांचे आहे. या पुस्तकात १३ अध्यायात १० प्रमुख मुद्धे आपल्यासाठी विशेष सादर केले आहे.
() बाहेरचे असणे लाभदायक ठरते :-
कोणत्याही व्यवसायात बाहेरून प्रवेश करण्यात आपले स्वतःचे काही फायदे असतात. जसे आपण नव्या व्यवसायाचा विचार हा पूर्णपणे नवीन दृष्टीकोनातून करतो. नवीन असल्यामुळे आपल्या जिज्ञासा आपल्याला निरखून पारखून करण्यास प्रेरित करतात ज्याबद्दल त्या क्षेत्रातले प्राथमिक लोक त्याचा विचार करण्यापासून दूर असतात. रॉनी सांगतात की, कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आपल्याला अशा समूहाची स्थापना करण्याची गरज आहे जी आपल्या पुर्णत्वेसाठी आपल्याला आव्हान देण्यास सक्षम असेल. मुंबई मधील एका पारशी कुटुंबात जन्म झालेले रॉनी परंपरागत कुटुंबातील आणि स्टुडीओचा बोलबाला असलेल्या प्रसिद्ध बॉलीवूड उद्योगात पाय रोवण्यात यशस्वी झाले.
() डोळे झाकून गर्दीत चालणे :-
डोळे उघडे ठेवून आपल्या आजूबाजूला काय चालले आहे याचे निरीक्षण करणे म्हणजेच जगातल्या प्रचाराचे पालन करून गर्दीत मानखाली घालण्याच्या मानसिकतेपासून दूर राहणे. रॉनी मिश्कीलपणे सांगतात की, ‘जेव्हा आपण कुणाचा पाठपुरावा करित असतो तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीचा फक्त पाठमोरा भाग दिसतो’. युटीव्ही ने नूतन साहित्य आणि प्रारूपच्या नीतीचा अवलंब करून दैनिक धारावाहिक शांती, तरुणांसाठीबिंदास मुलांसाठीहंगामाचॅनेल प्रसारित केले. हे फक्त यामुळे संभव होवू शकते कारण त्यांनी ग्राहकांची नस पकडून त्यांच्यासमोर काहीतरी नवीन सादरीकरणाच्या इच्छाशक्तीने दमदार पाऊल उचलले. उदाहरण म्हणजे रॉनी यांनी भारतातील मुलांमध्येकार्टून नेटवर्कचे वेड बघितले. मग काय, त्यांना जाणवले की या क्षेत्रात स्थानिक साहित्य आणि चांगल्या ब्रांडच्या जोडीने बाजारात उडी घेण्याची हीच योग्य वेळ आहे. ते सांगतात की, ‘प्रत्येक दिवस हा आम्हाला गोष्टींना नव्या रुपात बघण्याची विचार करण्याची संधी देतो’.
() आपल्या असफलतेचे योग्य मुल्यांकन करणे :-
आपण आपल्या अपयशावर ताबा मिळवण्यासाठी त्याचे वैचारिक मुल्यांकन करणे, तसेच त्याचे परत निरीक्षण करून त्याचा केंद्रबिंदू शोधून काढणे महत्त्वाचे आहे. रॉनी या पुस्तकाच्या एका अध्यायात लिहितात की, ‘अपयश हे एक पूर्णविराम नसून एक अल्पविराम आहे.’ ते सल्ला देतात की, ‘अपयशी होणे अपरिहार्य आहे, याला आनंदाने सामोरे जा.’ उद्यमींनी अतिशय वाईट काळाची कल्पना करून त्याच्यातून बाहेर येण्याची धमक अंगीकारायला हवी. आपले मित्र आणि शुभचिंतक आपल्या या अपयशाच्या काळात अधिक मूल्यवान दृष्टीकोनातून आपल्या मदतीला येवू शकतात. अपयशाची गाठ पडल्यावर संस्थापकांना त्याचा स्वीकार करून नव्या उमेदीने स्वतःशी संवाद साधून त्यातून मार्ग काढून पुढे वाटचाल केली पाहिजे’.
याशिवाय आपण अपयशात केलेल्या चुकांचा पाठपुरावा करता सावधानता बाळगली पाहिजे. रॉनी यांना अतिशय कटू अनुभव आला जेव्हा त्यांचे होम शॉपिंग नेटवर्कचे काम त्यांच्या उमेदीपेक्षा फोल ठरले. रॉनी सांगतात की, ‘अपयशाला एका अडचणीच्या रुपात बघितले जाते पण तीच आपल्याला नवीन खजिण्याचा मार्ग दाखवीत असते’.
रॉनी सांगतात की, ‘अपयशाची अनिवार्य रुपात होणाऱ्या चकमकीची चर्चा ही बोलकी असली पाहिजे तिची मुस्कटदाबी होता कामा नये’. मी आधीच सांगितले होते की, ‘नकारात्मक दृष्टीकोन ठेवणारे तसेच आपल्या स्वप्नांची अवहेलना करणाऱ्यांपासून नेहमी सावध राहावे’. ते सांगतात की, ‘तुमचा समूह हा अयशस्वी आणि अपयशाशिवाय कधीच विकसित होवू शकत नाही. अपयश हे यशापेक्षा अधिक रोचक आणि शिक्षाप्रद आहे’.
() स्टार्टअप साठी संवाद आणि संस्कृतीची गरज आहे :-
संवाद आणि संस्कृती कोणत्याही स्टार्टअपच्या यशाला अनिवार्य आहे. रॉनी सांगतात की, ‘संस्कृती ही यशस्वी प्रयत्नांची संजीवनी आहे आणि उत्तम संवाद हा कोणत्याही कंपनीच्या संस्कृतीला मजबुती प्रदान करतो’. संस्थापकांना शिष्टाचार, संपूर्णता, आकर्षण, स्पष्टता यांच्या सोबतीने दुस-याशी संवाद साधता आला पाहिजे. त्या दिवसात दूरदर्शनने यूटीव्हीचा एक कार्यक्रम रद्द केला त्यावेळेस रॉनी यांनी आपल्या टीम बरोबर स्पष्ट थेट संवाद साधला आणि त्यांच्या सहयोगानेच उशिरा वेतन मिळूनही कोणत्याही किंतु शिवाय सहयोगी त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले.
आपल्या कार्यालयात तडक भडक दिखाऊपणापेक्षा सजीवता, संपर्क, आणि उर्जेचा एक भाव असला पाहिजेटाउन हॉल आणि कार्यालयातील लोकांबरोबर बसून संवाद साधून संस्कृतीच्या निर्माण आणि त्याच्या सुदृढीकारणासाठी एक महत्वपूर्ण भूमिका घेऊ शकतात. यामध्ये संस्थापकाने काय संवाद साधला यापेक्षा तो कोणत्या भावनेने साधला हे महत्वाचे असते. हास्य बुद्धिमत्तेच्या भावनेचा संवाद अधिक महत्वपूर्ण ठरू शकतो. रॉनी वर्षाअखेरीस आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना एक इमेल लिहितात ज्यात येणाऱ्या वर्षाचे प्रेरणादायक स्वरुपाचे निर्णय घेऊन त्याचे समालोचन करण्यावर एक प्रकाश टाकला जातो.
() नव्या प्रचाराची ओळख :-
संस्थापकांना नव्या प्रणालीच्या अनुभवासाठीवळणाच्या जवळपास बघण्याचादृष्टीकोन असण्याव्यातिरिक्त जे त्यांच्या धैर्याचे खच्चीकरण करण्याच्या मार्गावर आहेत त्यांच्याकडे सुद्धा एक दृष्टीकोन ठेवला पाहिजे. नित्य नव्या विश्लेषणाद्वारे तुम्ही नव्या संधी शोधू शकतात कारण जोखमीच्या चुकीच्या मार्गावर जाणाऱ्या पावलांना ओळखणे अधिक कठीण आहे. रॉनी सांगतात की, ‘आपल्या यशाच्या मार्गावर अडथळे आणणाऱ्यांना चिन्हित करणे हे कोणत्याही व्यवसायाचा एक कठीण पैलू असतो’. याव्यतिरिक्त तोटा किंवा नुकसानी मध्ये घट करणे, तयार योजनेची अंमलबजावणी करून मार्ग बदलने हे सुद्धा अवघड आहे हे रॉनी आपल्याजोकर और डान्स पे चान्ससारख्या काही फ्लॉप सिनेमाद्वारे समजू शकले. ते मान्य करतात की या सिनेमाच्या निर्मितीच्या मध्ये सगळे आलबेल दिसत असून त्यांची इच्छा असूनही ते थांबवू शकत नव्हते.
() संधीने दार ठोठावल्यावर दार नक्की उघडा :-
संधीला ओळखून तिला बळकावण्याव्यतिरिक्त भारतात विशाल प्रमाणात असंघटीत बाजारातील शक्तीला ओळखण्याचा प्रयत्न करा. रॉनी सांगतात की, ‘वर्तमानात तुम्हाला आधीपेक्षा अधिक जोमाने एका मोठ्या चित्राला दुसऱ्यांपेक्षा कितीतरी पटीने, लवकर उत्तम प्रकारे प्रसारित करण्याची गरज आहे’. वास्तविक त्यांनी आपल्या कारकीर्दीच्या प्रारंभी एका परदेशी दौऱ्यादरम्यान योगायोगाने टूथब्रश बनविणारी मशिनरी बघून भारतात मिळणाऱ्या एका मोठ्या संधीचा मागोवा घेत ब्रिटनहून मशिनरी आयात करून याच्या निर्मितीत एक भक्कम पाऊल ठेवले.
() बदलासाठी मोठ्या मार्गाचा अवलंब करा :-
अनेक छोट्या संधींना पाठीमागे टाकून जीवनात बदल घडविण्यासाठी मोठ्या बिंदूंना ओळखणे. रॉनी सांगतात की, एका निश्चित स्तरापर्यंत जाण्यासाठी त्या संस्थेच्या संस्थापकांना एक आवश्यक दृष्टी वेगाचे प्रदर्शन करणे गरजेचे आहे. उदाहरणादाखल त्यांनी भारतात केबल टीव्हीच्या एका संधीचा फायदा घेऊन डेमोच्याद्वारे बाजारात त्या दृष्टीने शिक्षित करण्याव्यतिरिक्त घरोघरी जाऊन लोकांना त्याबद्दल माहिती दिली. हॉटेलच्या शृंखलेला उपभोक्त्यांच्या रुपात स्वतःला साकारले. तसेच त्यांनी झी टीव्हीला साहित्य उपलब्ध करवून या उपग्रहाच्या लहरींवर स्थान मिळविले आणि नंतर विजय माल्ल्यांच्या स्वामित्व असलेल्या विजय टीव्हीचे हक्क मिळविण्यात यशस्वी झाले.
() सकारात्मक विचारधारा ठेवणे :-
सदैव सकारात्मक विचारसरणी अंगीकारणे, पण जग नेहमी एका उमेदीवर चालत नाही. रॉनी सांगतात की, ‘जे लोक स्वतःच्या लक्षावर ध्यान केंद्रित करून आपले सर्वस्व पणाला लावतात तेच यशाचे खरे मानकरी असतात’. याशिवाय त्यांचे मानणे आहे की कोणत्याही कौटुंबिक आर्थिक परिस्थितीचे रडगाणे गाणे किंवा उच्च शिक्षण पर्याप्त पैशांची कमतरता असण्याची बतावणी चालत नाही. ते दर्शवितात की, ‘स्वतः मधील विश्वासाची भावना असमानतेच्या खुणा पुसण्याच्या मानसिकतेत परिवर्तन घडवितात’. मोठ्या शहरांच्या तुलनेत छोट्या शहरांच्या संस्थापकांना संधीच्या कमतरतेवर पश्चातापाची वेळ ही नाहीच्या बरोबर असते कारण तो एक ग्रामीण भारतच आहे जिथे येणाऱ्या दिवसात संधीचे वारे वाहणार आहे, मग ते डिजिटल मिडिया किंवा आयटीचे क्षेत्र असो.
रोनी सांगतात की, भविष्य उजळण्याची वाट बघू नका पण दृढ विश्वासाने ती मिळवण्याचा प्रयत्न करा. ते ही गोष्ट आपला सिनेमारंग दे बसंतीच्या आठवणींना उजाळा देत सांगतात की जिला अनेक टीकाकारांनीतुक्काठरविण्याची कोणतीही कसर ठेवली नाही. या सिनेमाचे प्रदर्शन पण अनेक वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. विशेषकरून यांना देशाच्या सैन्य प्रमुखांची मान्यता मिळवायची होती आणि नशिबाने ती मिळाली.
() विकासाच्या ध्येयाने वेडे बनणे:
संस्थापकांना गुंतवणूकदारांचे लक्ष घटनाक्रमावर ध्यान केंद्रित करण्याव्यतिरिक्त व्यावसायिक रणनीती, टीम ब्रांडच्या स्तरावर ध्यान केंद्रित करणे गरजेचे आहे. कोणत्याही व्यवसायाच्या संक्रमनाच्या काळात हितचिंतकांच्या हिताचा विचार करून संस्थापकांना आपले जहाज मध्यावर सोडण्यापेक्षा दुसऱ्यांना सुपूर्त करण्याचा विचार अधिक हितकारी आहे. भारत, अमेरिका, कॅनडा जपान सहित अनेक देशांत आपली गुंतवणूक मोठ्या कंपन्यांच्या आपल्या अनुभवाच्या आधारे रॉनीचे मानणे आहे की जरी गुंतवणूक व्यावसायिकांसाठी नवीन मार्ग खुले करीत असले तरी हे सुनिश्चित करणे व्यावसायिकांचे काम आहे की कोणत्याही गुंतवणूकदारांबरोबर कोणत्याही स्तरावर धोका होता कामा नये.
(१०) तुमच्या ध्येयापासून विचलित होऊ नका :-
रॉनी सांगतात की, ‘जे ध्येय तुम्ही निश्चित केले आहे त्यावर तुम्ही ठाम रहा कठीण वेळेला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. कठीण परिस्थिती तुम्ही कशा पद्धतीने हाताळता हे तुमच्यातल्या चपळतेवर निर्भर आहे. ते गंमतीत सांगतात की त्यांना कितीतरी वेळेसकैट ऑफ २० लाइव्सच्या खिताबांनी नावाजले आहे आणि प्रत्येक वेळेस त्यांचे परतणे यशस्वी झाले. ते सांगतात की, ‘आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा प्रत्येक क्षण त्यासाठीच जगा’. व्यावसायिकतेच्या या प्रवासाच्या डोहात प्रत्येकजण पोहू शकतो, इथे तुमची पार्श्वभूमी किंवा शैक्षणिक योग्यता विचारात घेतली जात नाही. पण यशासाठी हा एक किंवा दोन वर्षाचा प्रवास नसून लांबचा प्रवास करावा लागतो. ‘उद्यमीता एक सहल नसून एक यात्रा आहे’. उद्यमशिलतेमध्ये संस्थापक एकापेक्षा अधिक डाव खेळू शकतो. ते कब्बडी आणि ग्रामीण व्यवसायाच्या आपल्या अनुभवाचे उदाहरण देतांना सांगतात की, ‘एक यशस्वी संस्थापक स्वतःला एका नव्या उंचीवर घेऊन जाऊ शकतो, मात्र त्याच्यातील जिज्ञासा, संशोधक वृत्ती जागरूक असणे गरजेचे आहे.
रॉनी सांगतात की, ‘सफलता, महत्वकांक्षा, भूक, ध्येय आणि क्षमता ही अंतर्मनामधून येते’. कुणाप्रती लक्ष केंद्रित करणे, प्राथमिकता, सहानुभूती आणि इमानदारी एखाद्या व्यावसायिकाच्या अनुभवला दृढ बनविते. शेवटी ते सांगतात की, ‘आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्याचे स्वप्न बघा आणि जेव्हा त्याची पूर्तता होईल तेव्हा उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघण्याची सवय लावा’.
याशिवाय या पुस्तकाच्या समर्थनाची एक पूर्ण शृंखला आहे जिचे काही नमुने खाली दिले आहेत.
मला पूर्ण विश्वास आहे की हे पुस्तक भारताच्या तरुण पिढीच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांना प्रोत्साहित करेल याच पद्धतीने ते करोडो भारतीयांना चांगल्या जीवनाची पूर्तता करण्यासाठी नवीन योजनेच्या शोधासाठी आपली उर्जा समर्पित करू शकतील’. ( नरेंद्र मोदी, पंतप्रधान )
माझे मानणे आहे की रॉनीमध्ये महान नेतृत्वाचे सगळे गुण उपलब्ध आहेत मग ते आशावाद आणि जिज्ञासा यांच्या भावनेला आत्मसात करण्याचे असो, जोखमेचे काम असो किवा नेहमी उत्कृष्ट करण्याच्या पाठपुराव्याचा असो’.(बॉब आयगर, वाल्ट डिस्ने कंपनी )
मला उमेद आहे की रॉनीची गोष्ट आयुष्यात पुढे जाण्याचे स्वप्न बघणाऱ्या उद्यामिंसाठी एक मोठा संकेत ठरू शकेल’. (जेम्स मर्डोक, २१ वी सेन्चुरी फॉक्स )
व्यावसायिक दृष्टीकोन, रचनात्मक आणि साहसापेक्षा अधिक काय करायचे काय नाही करायचे हे ओळखून एखाद्या व्यवसायातून बाहेर निघून दुसरीकडे प्रवेशासाठी जाणे कुशाग्र बुद्धिमत्तेसाठी आहे’. (किशोर बियाणी, फ्युचर ग्रुप)
चांगला व्यावसायिक व्यक्तिगत यशाचा अनुभव करतो. महान उद्यमी आपल्या यशाला अधिक पटीने वाढवून आपल्या बरोबर दुसऱ्यांना पण पुढे जाण्यासाठी मदत करतो. रॉनी एक महान उद्यमी आहेत’. (आनंद महिंद्रा, महिंद्रा समूह)
हे एक असे पुस्तक आहे ज्याची प्रेरणा एका उभरत्या राष्ट्राला गरजेची आहे’. (नंदन निलकेणी, सह-संस्थापक इंफोसिस)







अनुवाद : किरण ठाकरे











*To Become Successful in Life*... आयुष्यात यशस्वी होण्यासाठी

*To Become Successful in Life*..

 आयुष्यात यशस्वी होण्यासाठी 26......परफेक्ट गुरूमंत्र*
 DEVELOP ........... SELF-CONFIDENCE (आत्मविश्वास विकास) 
1. Empower smiling. चेहऱ्यावर हास्य असू द्या 
2. Relax yourself. आरामशीर / तणावमुक्त रहा
3. Have a clear understanding. आपले विचारात सुस्पष्टता असू द्या 
4. Avoid misconceived thoughts. गैरसमज / चुकीचे समज टाळा 
5 .Prompt decision - making. तात्काळ निर्णयक्षमता 
6. Avoid inferiority complex. न्यूनगंड बाळगू नका 
7. Believe yourself. स्वतःवर विश्वास ठेवा 
8. Be inspirational. प्रेरणादायी रहा 
9. Develop challenging attitude. आव्हानात्मक दृष्टिकोन विकसित करा 
10. Be a positive thinker. सकारात्मक विचार ठेवा 
11. Have self – encouragement. स्वयंप्रेरित रहा 
12. Avoid procrastination. चालढकल (दिरंगाई) टाळा 
13. Learn lessons from others. इतरांकडून प्रेरणा घ्या 
14. Don't lose your spirit. हिंमत / धीर सोडू नका 
15. Think about time-use. वेळेचे काटेकोर नियोजन करा 
16. Be smart at all costs. नेहमी चाणाक्ष रहा 
17. Be a goal setter. ध्येय निश्चित करा 
18. Be punctual. तत्पर रहा 
19. Focus Involvement. कामावर लक्ष केंद्रित करा 
20. Possess mental alertness. मानसिकरित्या तत्पर रहा 
21. Sharpen your intelligence. आपली बुद्धीमत्ता अधिक तीक्ष्ण करा 
22. Try to be intellectual. बुद्धीमान बनण्याचा प्रयत्न करा 
23. Be co-operative. सहकार्याची भावना बाळगा 
24. Avoid fearful feelings. मनातील भीतीची भावना टाळा 
25. Strengthen your will power. आपली इच्छाशक्ती प्रबळ असू द्या 
26. Never bother about failure. कधीही अपयशाच्या तणावाखाली राहू नका. - 



Thank You धन्यवाद

स्वत:शी संवाद साधणं हा सकारात्मक स्व-प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आहे.


विचार सतत वाहतात, पण त्यांचे सामथ्र्य कमी होत नाही.. ते नदीप्रमाणे असतात.. एक एक विचार येत गेला, नाहीसा होत गेला.. पण सत्ता चालली ती विचारांचीच.. मनुष्याला या विचारांपासूनच प्रेरणा मिळत आली आहे. विचारांच्या सामर्थ्यांची तुलना करावी अशी अन्य शक्ती या जगात नाही..
आचार्यविनोबा भावे


विचारांचं सामथ्र्य फार मोठं असतं. असं म्हटलं जातं की, विचारांनीच माणूस घडतो. सकारात्मक विचार करणाऱ्यांची प्रगती लवकर होताना दिसते. त्याउलट नकारात्मक विचार करणाऱ्यांना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. सामान्यपणे आपलं आपल्या विचारांकडे लक्ष नसतं; किंबहुना विचारांच्या बाबतीत जेवढी सजगता असायला हवी तेवढी आपल्यामध्ये नसते. एखादी चांगली गोष्ट करताना मनात येणारा पहिला सृजनशील विचार पकडून ठेवता आला पाहिजे, तशी सवयच लावून घ्यायला हवी तात्काळ कृतीच्या अंमलबजावणीची रूपरेषा ठरवली गेली पाहिजे. मनात येणाऱ्या पहिल्या विचारालाच नकारात्मक विचारांचे मळभ लाभले की कार्यसिद्धीला ग्रहण लागलंच म्हणून समजा. पाणी ज्याप्रमाणे उताराकडे वाहतं तसे बहुसंख्य वेळेला माणूस नकारात्मक विचार करताना दिसतो. बहुतेक वेळेला खालील प्रकारचे विचार कार्यप्रवण होण्यामध्ये आणि चांगल्या विचारांना प्रत्यक्षात सिद्ध होण्यामध्ये अडसर ठरतात. उदाहरणार्थ,
* मी केल्याने काय फरक पडणार आहे?
* मला जमण्यासारखं नाही ते.
* मीच का म्हणून करू?
* योग्य वेळ आल्यावर करू, आत्ताच काही घाई नाही.
* लोक काय म्हणतील, हसणार तर नाहीत ना?
* पण योजना असफल झाली तर?
* करायला हरकत नाही, पण मला नशीब कधीच साथ देत नाही.
पहिल्या विचारावर कार्यप्रवण होण्यामध्ये जरा काळ गेला की असे असंख्य विचार अडचणींचे डोंगर उभे करतात आणि चांगल्या विचाराची हत्या होते. थोर व्यक्तींच्या चरित्राचं परिशीलन केलं असता असं लक्षात येतं की, प्रतिकूल परिस्थितीतही केवळ सकारात्मक विचारांची साथ सोडल्यामुळे ते असामान्य कार्य करू शकले.

स्व-प्रतिमाग, विधायक विचार   
स्वत:बद्दल व्यक्तीचं चांगलं मत असणं हे सृजनात्मक विचारांच्या जोपासनेसाठी, आत्मविश्वास निर्मितीसाठी सुदृढ मानसिक स्वास्थ्यासाठी अग्रक्रमाची गोष्ट ठरतस्वची ओळख होणं ही या प्रक्रियेतील महत्त्वाचा सुरुवातीचा टप्पा आहे. सकारात्मक विचार करण्याची सवय लागली की आपोआपच स्वत:विषयी आदर निर्माण होतो सकारात्मक स्व-प्रतिमा निर्माण होते. चांगली स्व-प्रतिमा निर्माण होण्यासाठी स्वत:चं चिकित्सक अवलोकन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याबरोबरच सकारात्मक विचारांचा पाया म्हणून ओळखली जाणारी सकारात्मक स्व-प्रतिमा निर्माण होण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. सकारात्मक स्व-प्रतिमा असणारे व्यक्ती स्वत:बद्दल जागृत असतात. स्वत:च्या गुण-दोषांबद्दल त्यांना जाणीव असते. स्वत:बद्दल चांगली भावना योग्य निर्णय घेण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी, विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पेलण्यासाठी महत्त्वाची आहे.
स्वत:ला स्वीकारणं
बऱ्याच वेळा व्यक्ती स्वत:च्या रंग, रूप, उंची यानुसार स्वत:चं मूल्यमापन करतो. वर्ण काळा असेल, उंची कमी असेल तर स्वत:बद्दल नकारात्मक विचार निर्माण होतात. क्वचित प्रसंगी आलेल्या अपयशाने खचून जाता अपयशाच्या कारणांचा अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती ही निसर्गाची अद्वितीय कलाकृती असते, त्यामुळे इतरांशी तुलना करून स्वत:ला कमी लेखण्यापेक्षा स्वत:मध्ये सातत्याने सुधार कसा होईल, याचा प्रयत्न केला पाहिजे.
स्वत:शी संवाद साधणं
स्वत:शी संवाद साधणं हा सकारात्मक स्व-प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आहे. स्वत:ला स्वत:मध्ये असणाऱ्या गुण-दोषांसहित स्वीकारणं म्हणजेच सकारात्मक स्व-प्रतिमा निवडण्यासाठी उचललेलं पहिलं पाऊल होय. इतर व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करतात, त्यांना आपण कसे वाटतो, यावरून स्वत:ची किमत करू नये. कारण आपणच स्वत:ला चांगले ओळखू शकतो.
सकारात्मक स्व-सूचना
आधुनिक मानसशास्त्राने असे सिद्ध केले आहे की सकारात्मक स्व-सूचनांचा व्यक्तिमत्त्व विकासात चांगला परिणाम दिसून येतो. हे एक प्रकारचे सकारात्मक विचारांचे प्रशिक्षणच आहे. नियोजन करताना, निर्णय घेताना, कार्याची   अंमलबजावणी करीत असताना सकारात्मक स्व-सूचनांचा निश्चित फायदा होतो. स्वत:मध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टिकोनातून ही स्व-सूचनांचा उपयोग करता येतो. उदाहरणार्थ,
* मी प्रत्येक काम आत्मविश्वासाने करीत आहे.
* माझी एकाग्रता वाढली आहे.
* माझा सर्वाशी सुसंवाद आहे.
* माझे जीवन अर्थपूर्ण ध्येयनिष्ठ आहे.
* मी सकारात्मक आहे.
* स्वत:ला स्वीकारणे.
बऱ्याच वेळेला आपण जसे नाहीत तसे इतरांना दाखवण्याचा प्रयत्न करत असतो; परंतु यातून येणारी निराशा फार मोठी असते. तसेच यामध्ये आपण स्वत:लाच एक प्रकारे फसवत असतो. त्यामुळे आपण जसे आहोत तसे प्रदर्शित होणे महत्त्वाचे आहे. असे केल्याने स्वत:वरचा विश्वास आदर वाढतो.
नावीन्यत
जीवन जगत असताना नावीन्याचा सातत्याने पाठपुरावा केला तर सर्जनशीलतेचा विकास होण्यास हातभार लागतो. दैनंदिन कृती करताना एखादी समस्या सोडवताना यामध्ये आणखी काय नवीन करता येईल, याचा विचार केला तर अनेक मार्ग अजून सुचू शकतील. अगदी बोलतानाही अचूक, समर्पक अथवा नेहमी वापरतो त्यापेक्षा वेगळ्या शब्दांचा शोध घेतला तर भाषाही समृद्ध होईल. नावीन्य ही मनाची ओढ असली तरीही प्रत्यक्षात कृती करताना व्यक्ती नवीन मार्ग अवलंबायला तसा धजावत नाही. सकारात्मक विचारांमुळे या विचारसरणीमध्ये निश्चित बदल होऊ  शकतो. नव्या दृष्टिकोनातून विचार केला म्हणूनच आईनस्टाईन, बिल गेट्स, जेम्स वॅट, एडिसन, गौतम बुद्ध, जगदीशचंद्र बोस यांसारख्या महान व्यक्ती ज्ञानाच्या कक्षांची क्षितिजे विस्तारण्यात यशस्वी झाल्या.
इतरांसाठी चांगल्या गोष्टी करणे    
स्वत:साठी तर सगळेच जगतात; परंतु जो इतरांसाठी काही तरी चांगले करतो त्याला सकारात्मक ऊर्जेचे दालन खुले होते, स्वत:मध्ये आत्मप्रतिष्ठा निर्माण होते. प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार इतरांना मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकमेकांचा विचार केला तरच समाजाचा आणि राष्ट्राचा विकास साध्य होऊ  शकेल.
आनंदी राहणे
जीवनातील विसंगतींना अनुसरून थोडासा विनोद करणे, निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेणे, उत्तम कलाकृती, नाटके, साहित्य यांचे रसग्रहण करणे, थोडक्यात समग्रपणे जीवन जगणे यातूनच आनंदी वृत्ती तयार होते, जी जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करते.
स्वत:च्या क्षमतांचा पूर्णपणे उपयोग करायचा असेल तर स्वत:ची ओळख होणे सकारात्मक विचारांचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. सकारात्मक विचारसरणी असणारी सृजनशील माणसे समाजात आपले योगदान प्रभावीपणे देऊ  शकतात. चला तर मग, सकारात्मक विचारांच्या माध्यमातून स्वत:ची प्रतिमा उंचावण्याचा निर्धार करून राष्ट्र निर्माणाच्या कार्यास सिद्ध होऊ या.






प्रा. प्रवीण काळे
by- Loksatta



माझ्याबद्दल