गणपती ला अग्रपूजेचा मान असतो. ते विद्येचे दैवत आहे.
तो रंगभूमीवर अधिराज्य गाजवतो. नटेश्वरही आहे आणि शूर योद्धाही आहे. तो
चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती आहे. विघ्नहरण आणि बुद्धिदान हे गणेशाचे
गुण आहेत.
21 गणपतींचा मार्गदर्शक तो गणेश.
21 गणेशांचा मार्गदर्शक तो गणनायक.
21 गणनायकांचा मार्गदर्शक तो महागणपती. ओंकारामधील
अकार चरण-युगुल, उकार उदर-विशाल, मकार, महामंडल-मस्तकाकारे, या
मात्रांमध्ये सर्व वेद सामावले आहेत. ओंकार नादातून ब्रह्मविश्व निर्माण
झाले आहे. हे विश्व निर्मितीचे महाबीज आहे. तो गणेश आहे.
गणपती ला अभिषेक हा
अथर्व शीर्षाच्या 21 आवर्तनाणी पूर्ण केला जातो.
21 दूर्वांची जुडी गणपती ला वाहतात.
21 मोदकांचा नैवेद्य गणेशाला दाखवतात.
21 वनस्पती गणपती ला वाहतात : बेल, तुळस, शमी,
विष्णुकांत, देवदार, मोरवा, मधुमालती, धोतरा, डोलरी, अर्जुन, जाई, मका,
पिंपळ, बोर, आघाडा, कण्हेर, रुई, डाळिंब, केवडा, अगस्ती.
21 फुले गणपती ला वाहतात -जास्वंद,
मधुमालती, बकुल, नागकेशर, कण्हेरी, मादुरकी, शतपत्र, श्वेत कमळ, सोनचाफा,
उडी, मोगरा, प्राजक्त, गोविंद, रक्त कमळ, केवडा, सुपारी, धोतरा, चसई,
मोहोर, जाई आदी.
21 पुराणे – गणेश पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण,
पद्मपुराण, उत्तर, लिंगपुराण, उत्तरार्ध, शिवपुराण, ब्रह्मांडपुराण,
ब्रह्माखंड, मुद्गलपुराण, अग्निपुराण, नारद पुराण, वराह पुराण, मत्स्य
पुराण, भविष्य पुराण, अवंती खंड, ब्रह्म पुराण, वामन पुराण, गरुड पुराण,
स्कंद पुराण, प्रभासखंड.
21 राक्षसांचा संहार गणेशाने केला: नरातंक, कैटभ,
व्योमासुर, मदासुर, मत्सरासुर, क्रोधासुर, मेणासुर, देवांतक, त्रिपुरासुर,
लोभासुर, कमलासुर, दंभासुर, मायासुर, गजासुर, मधु, सिंदुरासुर, मोहासुर,
विघ्नासुर, अनलासुर, कामासुर, कमलासुर.
भारतात असेतू हिमाचल गणेशाचे नुसते पूजन होत नसून विदेशातही गणेशाचे
मोठय़ा भक्तिभावात पूजन केले जाते. सिंहली-पाषाण प्रतिमा, कंबोडियन पंचरसी,
इंडोचायना-चतुर्मुखी, दक्षिण बाली, चिनीमूर्ती, दिआंगच्या पठारावरील जावा
गणेशमूर्ती, मुलाधारी- बंगाल, जंडी- सिंगासरी कापलीक, बारा कापलीक कामेर-
पंचरसी, उदयगिरी गुहेतील नेपाळ- षड्भुज, भेडाघाट-गणेशानी, बोर्नीओ-
प्रस्तर, शाम- हनोई, शाम- विरुन, कामेर-पूर्वकालीन, ब्रह्मदेश- गवांपती,
जपान- कांगितेन, नेपाळ- हेरंभ, स्विचिंग- नृत्यमूर्ती, वेरूळ- सप्तमातृका,
तिबेट- हेरंभ, कुमरा-शक्तीसह गणेश या विदेशात आहेत. व्यासांचा लेखक
म्हणूनही श्री गणेशाचा उल्लेख केला जातो.
https://palajganapati.wordpress.com